केज,(प्रतिनिधी )
केज पोलिसांनी मागील चार वर्षात ३७ गुन्ह्यात जप्त केलेला २ लाख १५ हजार ५७६ रुपयांचा देशी व विदेशी दारूचा साठा मंगळवारी ( ता. १२ ) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ठाण्याच्या परिसरात नष्ट केला.
केज पोलिसात सन २०१७ ते सन २०२० या कालावधीत ठाण्याच्या हद्दीत कारवाया करून ३७ गुन्ह्यात २ लाख १५ हजार ५७६ रुपयांचा देशी व विदेशी दारूचा साठा जप्त करून ठेवलेला होता. मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास माजलगावचे जिल्हा दारू बंदी अधिकारी वाय. एस. वनमारे, केजचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, सामाजिक कार्यकर्त्या सीता बनसोड यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाण्याच्या परिसरात जेसीबीच्या मदतीने हा दारू साठा नष्ट करण्यात आला.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, फौजदार श्रीराम काळे, सहाय्यक फौजदार राजाभाऊ लांडगे, पोलीस नाईक अशोक नामदास, अमोल गायकवाड, जीवन करवंदे, हनुमंत चादर, उमेश आघाव, रमेश सानप हे पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS