केज प्रतिनिधी.
राजमाता जिजाऊंच्या संस्काराने स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी घडले. मानव कल्याणाच्या कार्याने स्वामी विवेकानंद विश्वगुरू ठरले. आजच्या युवकांनी या महापुरुषांचे विचार अंगिकारूने आवश्यक असून राष्ट्र उभारणीत युवकांचे स्थान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ गौतम पाटील यांनी केले. ते सरस्वती महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय युवक दिनाच्या कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ गौतम पाटील हे होते. तर प्रा डॉ अलका डांगे, डॉ वैशाली आहेर, डॉ नागेश कराळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. डॉ कराळे म्हणाले, स्वामी विवेकानंद यांचे जीवन कार्य, विश्वबंधुत्व, तरुणना विषयी त्यांचे विचार आणि वैयक्तिक जीवनातील चारित्र्य संपन्नता याविषयी विचार मांडले. प्रा डॉ डांगे यांनी, राजमाता जिजाऊंचा इतिहास, त्यांचा दूरदृष्टीपणा, त्यांच्यातील प्रशासकीय नेतृत्व, धैर्य या विषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक जे के जाधव यांनी तर आभार प्रा किरणकुमार धिमधिमे यांनी मानले. यावेळी प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

COMMENTS