नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार ) नायगांव येथील तहसील कार्यालयाच्या शेजारी असलेल्या सामाजिक न्याय भवन च्या परिसरातील विद्युत खांबाव...
नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार ) नायगांव येथील तहसील कार्यालयाच्या शेजारी असलेल्या सामाजिक न्याय भवन च्या परिसरातील विद्युत खांबावर चढलेल्या वानराच्या पिल्ल्याला शाॅक लागल्यामुळे गंभीर जखमी झाला होता परंतु महावितरण कंपनी व नगरपंचायतीच्या अग्निशामक दल कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे वानराचा पिल्लाला जीवदान मिळाले नायगांव येथील तहसील कार्यालयाच्या शेजारी असलेल्या सामाजिक न्याय भवन च्या परिसरातील विद्युत खांबावर वानराच्या पिल्यास शॉक लागल्याने गंभीर जखमी झाला होता नगरपंचायत अग्निशामक दल चे कर्मचारी बालाजी चव्हाण. विजय इंगळे.व महावितरण कंपनीचे अधिकारी गंदे साहेब. लाईनमण प्रमोद चिवळे .दिगांबर गंजेवार. बाळु भेदे.यांच्या सतर्क भूमिकेमुळे सदरील विद्युत पुरवठा बंद करून नगरपंचायतला सुचना केल्या मुळे नगरपंचायतीच्या अग्निशामक दलाच्या मदतीने व महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी लाईनमन यांनी विद्युत खांबावर चढून छोट्याशा वानराच्या पिलास जीवदान दिले असल्याने त्याचा जीव वाचला गेला व त्या वानराच्या हाताला मार लागल्याने गंभीर जखमी झाला त्यास नागरिकाने भाकरी खाऊ घालून व पाणी पाजून सोडून दिले यामुळे महावितरण कर्मचाऱ्यांचे व नगर पंचायत अग्निशामक च्या कर्मचाऱ्यांचे व सामाजिक न्याय भवन येथील मुख्याध्यापक चव्हाण सर इत्यादिचे कौतुक होत आहे.

COMMENTS