नायगांव प्रतिनिधी (रामप्रसाद चन्नावार ) नायगांव तालुक्यातील मांजरम येथील शेतकरी संभाजी शेटेवाड यांनी पतंगाच्या दोऱ्याला अडकून पडलेल्या पक्...
नायगांव प्रतिनिधी (रामप्रसाद चन्नावार )
नायगांव तालुक्यातील मांजरम येथील शेतकरी संभाजी शेटेवाड यांनी पतंगाच्या दोऱ्याला अडकून पडलेल्या पक्षाची सुखरूप सुटका करून त्याला जीवनदान दिले.
जुन्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी जो तो आपापल्या घाईत असतांना फडफडणाऱ्या पक्षाकडे कुणाचीही नजर जात नव्हती. आशामध्ये पक्षीमित्र शेटेवाड यांची नजर या पक्षाकडे गेली. शेटेवाड यांनी वेळ न जाऊदेता त्या सुंदर पक्षाचा जीव वाचवला. यामुळे आजही माणूसकी जीवंत असल्याचे दिसून आले. शेतकरी संभाजी शेटेवाड या पक्षीमित्राचे राजेश जेटेवाड यांच्यासह अनेक जन कौतुक केले.

COMMENTS