केज! प्रतिनिधी
मौजे लहूरी ते कानडी माळी या रस्त्याचे काम वेळेत पूर्ण होत नसल्यामुळे हे काम तात्काळ सुरु करण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेड केज तालुका यांच्यावतीने तालुका अध्यक्ष कैलास चाळक यांनी केली आहे
याबाबत त्यांनी उपाभियंता केज यांना लेखी पत्र दिले असून त्यांनी या पत्रात म्हटले आहे की मौजे लहूरी ते कानडी माळी या रस्त्याचे काम वेळेत होत नसल्याचे निदर्शनास येत आहे सदर रस्ता बरेच दिवस झाले मंजूर झाला असून हा रस्ता खुपच खराब व खड्डेमय झाला आहे या रस्त्यावरून जाणाऱ्या व येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे रस्ता वेळेत पूर्ण न झाल्यास अपघाताची शक्यता नाकारता येत नाही सदर रस्ता मंजूर असतानासुद्धा सबंधित अधिकारी व गुत्तेदार हे काम करण्यास टाळाटाळ का करत आहेत हे कळेनासे झाले आहे तसेच इस्टीमेट नुसार रस्ता वेळेत पूर्ण करणे सबंधित आदेशित होणे अत्यावश्यक आहे तरी सबंधित गुत्तेदारास रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरु करण्याचे आदेश द्यावेत अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा या पत्राद्वारे देण्यात आला आहे या पत्रावर कैलास चाळक अजित धपाटे महावीर पटेकर सागर चाळक विकी घोडके सुर्दशन मुंडे त्र्यंबक नीळकंठ श्रीराम चाळक ,लियाकत शेख यांच्या सह्या आहेत

COMMENTS