राम दातीर
माहूर(प्रतिनिधी )मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त दि.6 बुधवार रोजी माहूर शहरात दर्पणदिन उत्सहात साजरा करण्यात आला. शहरातील खाजगी सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य यांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
मराठी पत्रकार संघाच्या वतीने आद्य पत्रकार, मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती अर्थात दर्पण दिनाचे औचित्य साधून माहूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने संघटनेचे तालुकाध्यक्ष सरफराज दोसानी यांनी संघटनेच्या सदस्यांचा स्व खर्चाने विमा योजनेत समावेश करून सभासदांना पत्रकार दिनाची भेट दिली. यावेळी कार्यक्रमाला पत्रकार संघाचे अध्यक्ष सरफराज दोसानी,कोषाध्यक्ष कैलास बेहेरे, जयकुमार अडकिने, पुंडलिक पारटकर, राज ठाकूर, साजिद खान, अर्जुन जाधव, डॉ. जयप्रकाश द्रोनावर, अमजद पठाण, ज्ञानेश्वर पवार, अजयकुमार कंधारे, प्रा.प्रवीण बिरादार, अरुण पवार, सुरज खोडके, संजय सोनटक्के, राम दातीर, राजकिरण देशमुख, गजानन कुलकर्णी,नितेश बनसोडे यांच्या सह इतर पत्रकार उपस्थित होते.

COMMENTS