केज-रमेश इतापे:- तालुक्यातील उंदरी येथे स्वराज्य आणि मायेची फुंकर घालून रयतेचा आत्मविश्वास वाढवणाऱ्या अवघ्या मराठी मूलखाच्या माऊली राष्ट्रम...
केज-रमेश इतापे:-
तालुक्यातील उंदरी येथे स्वराज्य आणि मायेची फुंकर घालून रयतेचा आत्मविश्वास वाढवणाऱ्या अवघ्या मराठी मूलखाच्या माऊली राष्ट्रमाता राजमाता जिजाऊमासाहेब यांची जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन करून जिजाऊ वंदनेने करण्यात आली.दरवर्षी गावामध्ये छावा संघटनेच्या वतीने जिजाऊ जन्मोत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येतो. यावेळीही गावातील तरुणांनी व्यसनमुक्ती चा संदेश देत गोवा गुटखा जाळून होळी करून व्यसनमुक्ती साठी पुढाकार घेतला. व यावेळी छावा जिल्हाप्रमुख शिवाजी दादा ठोंबरे, उद्धव ठोंबरे, किशोर ठोंबरे, समाधान ठोंबरे, भैय्या ठोंबरे, विष्णू ठोंबरे ,गणी भैया श्याम ठोंबरे ,शाहू ठोंबरे व गावातील नागरिक उपस्थित होते.

COMMENTS