धर्माबाद (अहमद लड्डा)
डिजिटल साहित्य आणि सर्जनशील लेखन क्षेत्रातील प्रतिष्ठित पुरस्कार ' स्टोरी मिरर स्कुल रायटिंग कॉम्पिटेशन शिक्षक गट ’ या स्पर्धेत नासा येवतीकर यांच्या 'कळी उमलण्याआधी' या लघुकथेला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मेडल पोस्टाने नुकतेच प्राप्त झाले आहे. अठरा वर्षे पूर्ण न झालेल्या अश्या बालविवाह झालेल्या गीता नावाच्या मुलीची या लघुकथेत करूण कहाणी सांगितली आहे.
ऑनलाईन क्षेत्रातील स्टोरी मिरर हे नवोदित लेखकांना प्रोत्साहित करणारी आणि दरमहा वेगवेगळी स्पर्धा आयोजित करून लेखकांना प्रेरणा देणारी अँप आहे. नासा येवतीकर यांचे या स्टोरी मिरर अँपवर 62 लघुकथा आणि 90 कविता प्रकाशित झाले आहेत. गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षी देखील त्यांना याच स्टोरी मिरर अँपने ‘ऑथर ऑफ द इयर/वर्षातील सर्वोत्कृष्ट लेखक - 2020’ साठी नामनिर्देशित केले आहे. स्टोरीमिरर हे लेखक आणि वाचकांसाठी भारतातील सर्वात मोठी बहुभाषिक ऑनलाईन साहित्य मंच असून नामांकन मिळालेल्या 2 टक्के लेखकांमध्ये नासा येवतीकर यांच्या नावाचा समावेश असणे ही फार मोठी गोष्ट आहे.
दिनांक 31 जानेवारी 2021 पर्यंत मिळणाऱ्या सर्वाधिक वोट्स आणि संपादकीय गुणांच्या आधारे विजेतेपद निश्चित केले जाणार आहे.
कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र संचारबंदी होऊन लॉकडाऊन झाले होते. याच काळात नासा येवतीकर यांनी आपल्या लेखन छंदाची जोपासणूक करीत या काळात भरपूर लेखन केले आहे. आतापर्यंत सात वैचारिक लेखसंग्रह एक कवितासंग्रह आणि एक कथासंग्रहाचे पुस्तक त्यांच्या नावावर प्रकाशित झाले आहेत. त्यांना मिळालेल्या यशाबद्दल साहित्य क्षेत्रातून जेष्ठ साहित्यिक नागेश शेवाळकर, अरुण देशपांडे धनंजय गुडसुरकर, अरविंद कुलकर्णी, राजेंद्र शेळके, जी. एस. पाटील, सौ. भारती तिडके, अंकुश शिंगाडे, रूपाली घोडवजकर, पांडुरंग आडबलवाड, विनायक काकुळते, प्रदीप पाटील, अर्चना गरुड, गणेश सोळुंके, सुंदरसिंग साबळे, सुनीता आवंडकर, कवळे मॅडम, व्यंकटेश काटकर, पत्रकार भगवान कांबळे, कुणाल पवारे यांनी अभिनंदन केले आहे. तर शैक्षणिक क्षेत्रातून तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी एल. एन. गोडबोले, माजी शिक्षण विस्तार अधिकारी प्रभाकर कमटलवार, शिक्षक परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष मधुकर उन्हाळे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष संजय कोठाळे, जिल्हाध्यक्ष दत्तप्रसाद पांडागळे, सरचिटणीस दिगंबर पा. कुरे, व्यंकट गंदपवार, नागेश चिंतावार, बिलोली तालुकाध्यक्ष संजीव गंजगुडे, सेवानिवृत्त पदोन्नत मुख्याध्यापक शेषेराव माडेवार, मुख्याध्यापक एम. एस. वारले, मारोती कागेरू, राजेश्वर डोमशेर, केंद्रप्रमुख आबासाहेब उस्केलवार, नंदकुमार राजमल्ले, रमेश इटलोड, सर्पमित्र क्रांती बुद्धेवार, उदयकुमार शिल्लारे, साईनाथ सायबलू, किरण रणवीरकर, अतुल बागडे, माधव सोनटक्के, वीरेंद्र हसनाळे, राजेश्वर इंदूरकर, योगेश राजापूरकर, राजकुमार दाचावार, बालाजी पेटेकर, बाळासाहेब कदम, माधव हिमगिरे, संतोष मानेलु, एम.डी. भोसले, शंकर हासगुळे, संजय गैनवार, एम.पी. गिरगावकर, विकास जाकापूरे, अरुण ऐनवाले, विजयकुमार तेलंग, मारोती कांडले, राम मठवाले, शिवाजी सूर्यवंशी, मारोती भोसले, संजय ठक्कुरवार, प्रल्हाद तुमेदवार, इलियास शेख, व्यंकटेश भांगे, अशोक अमृते, श्रीकांत चरलेवार, संजीवकुमार हामंद, नवाब पाशा शेख, श्याम मुलकोड, एच.पी. बाचेवाड, मरकंटे, संजय नोमुलवार, रामरेड्डी अरकलवार, शंकर गंडरोड, डी.एन. श्रीमंगले, आनंद यडपलवार, गोविंद येळगे, काशीनाथ वाघमारे, विरेश कुंटेवाड, अशोक इलतेपोड, देविदास निरडवाड, सतीश कामीनवार, जी.बी. मोरे, सुधाकर चिलकेवार, संजय कदम, अभिनंदन प्रचंड, बी.के. तोटावाड, विशाल चव्हाण, जे.एन. हंगरगे, साईनाथ कामीनवार, पी.जी. पालंचवार, एजाज अहमद सय्यद, एस.बी. मस्तुद, ललन्ना गुडलावार, नागोराव कमलाकर, आनंद पाटील, लक्ष्मण शंकरोड आदींनी त्यांचे कौतुक करून त्यांना पुढील लेखनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS