माजलगाव/प्रतिनिधी कर्मवीर एकनाथराव आव्हाड यांच्या जयंती निमित्त कार्यकर्ता संवाद परिषदेचे आयोजन दिनांक 19 जानेवारी मंगळवार रोजी मानव...
माजलगाव/प्रतिनिधी
कर्मवीर एकनाथराव आव्हाड यांच्या जयंती निमित्त कार्यकर्ता संवाद परिषदेचे आयोजन दिनांक 19 जानेवारी मंगळवार रोजी मानवी हक्क अभियान कार्यालय तेलगाव तालुका ता.धारूर जिल्हा बीड येथे सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे तरी या कार्यकर्ता परिषदेच्या अध्यक्षस्थानी मानवी हक्क अभियानाचे कार्याध्यक्ष दादासाहेब शिरसागर हे राहणार असून कार्यकर्ता संवाद परिषदेचे उद्घाटन डॉ. मिलिंद आव्हाड हे करणार आहेत तर या परिषदेला मार्गदर्शन करण्यासाठी हेरंभ कुलकर्णी. सामाजिक बदलाचे अभ्यासक हे मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत तरी या कार्यकर्ता संवाद परिषदेस उपस्थित राहण्याचे आवाहन मानवी हक्क अभियानाचे जिल्हाध्यक्ष राजेश घोडे यांनी केले आहे

COMMENTS