सदृढ बालक स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न


जिल्हा प्रतिनिधी महेंद्र पुरी, हिंगोली

राजयोग मेडीमार्ट व कस्तुरी कापड दुकान द्वारा सदृढ बालक स्पर्धा घेण्यात आली होती . या स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम दिनांक 27 डिसेंबर रोजी हिंगोली चे अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री यशवंत काळे व प्रसिद्ध बाल रोग तज्ञ डॉ मुरलीधर तोषनीवाल यांच्या हस्ते संपन्न झाला. ही स्पर्धा 0-2 ते व 2 ते 5 अशा दोन वयोगटांमध्ये घेण्यात आली. 02 या वयोगटांमध्ये एकूण दीडशे 150 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला तर 2 ते 5 या वयोगटांमध्ये 104 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉक्टर सौ उमा तोष्णीवाल डॉक्टर स्वप्नील गिरी श्रीमती सुनिता मुळे सौ संगीता चौधरी डॉक्टर प्रेमेन्द्र बोथरा श्री प्रवीण सोनी श्री रत्नाकर महाजन यांनी काम पाहिले. 0 ते २ वर्ष गटांमध्ये प्रथम पारितोषिक शौर्य बुद्धघोष कुरे द्वितीय पारितोषिक स्पुहा स्वप्निल सोनपावले तृतीय पारितोषिक प्रभास सचिन बंडाळे यांनी पटकावले ,तर 2 ते 5 या वय वर्ष गटांमध्ये प्रथम पारितोषिक कीर्ती दीनानाथ घोंगडे पाटील द्वितीय पारितोषिक भव्या रितेश पुरोहित द्वितीय पारितोषिक तनवी विशाल दराडे यांनी पटकावले .बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी अभयकुमार यम्बल, प्रदीप दोडल ,रवींद्र दोडल ,डॉक्टर प्रशम दोडल रविशंकर देशपांडे उपस्थित होते यावेळी स्पर्धेचे आयोजक मिलिंद जैन प्रणव दोडल प्रतुल यम्बल नकुल दोडल यांनी सर्वांचे आभार मानले

टिप्पण्या
Popular posts
पोदार इंटरनॅशनल स्कूल नांदेडचे दहावीच्या निकालात घवघवीत यश
इमेज
मिल्लत नगरच्या नागरी सुविधासाठी लोकविकासचे शिष्टमंडळ मनपा आयुक्तांना भेटणार (तातडीने कारवाई केली नाहीतर माकप आंदोलनाच्या पवित्र्यात)
इमेज
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या विविध उपसमित्या जाहिर अभिमन्यू पवार, लातूर – उपाध्यक्ष, सौ. अश्विनी पाटील, पुणे, व सौ ग्रीष्मा पाटील, पालघर – उपाध्यक्ष पदी
इमेज
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची आजच्या समाजाला गरज
कामगार संघटनेच्या कार्यात कामगार कार्यकर्ते महत्त्वाचे- एस. के. शेट्ये*
इमेज