नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
अतिशय संवेदनशील असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे कामकाज करताना सूक्ष्म नियोजन महत्वाचे आहे.तक्रार कर्त्याचे जागेवर निरसन करा.आपण घेतलेल्या योग्य दक्षते मुळेच निवडणुका सुरळीत पार पडू शकतात याची जाणीव ठेवा प्रशासन आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही तहसिलदार गजानन शिंदे यांनी दिली.
ते दि.27 डिसेंबर रोजी रविवारी सामाजिक न्याय भवन तहसिलच्या बाजुस ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भात आयोजीत पहिल्या प्रशिक्षण शिबिरात बोलत होते.या वेळी नायब तहसीलदार नंदकुमार भोसीकर, नवनाथ वगवाड,ङि.ङी.लोंढे पेशकार आलमवाड सह अन्य अधिकारी उपस्थित होते.तालुक्यातील ७१ गावातील ६८ ग्रामपंचायत निवडणुक प्रक्रिया पार पाडण्यासाठी १०७५ कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आले असतांना एवढ्या महत्वपूर्ण शिबिरास तालुक्यातील १५० कर्मचाऱ्यांनी दांडी मारल्याने मोठे आचर्य व्यक्त केले जात आहे.या सर्व दांडी बहादराना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
सद्या कोरोनाची परिस्थिती पहाता प्रशिक्षणार्थीना स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली होती.कोरोनाचे सर्व नियम व सुरक्षेची दक्षता या बैठकी दरम्यान घेण्यात आली.या बाबद तहसिलदार शिंदे यांच्या सी संपर्क साधला असता गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.दुस-या शिबिरास सर्वच कर्मचारी उपस्थित राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली.

COMMENTS