धारूर /जगदीश गोरे
धारुर तालुक्यातील बालाघाट डोंगररांगेत वास्तव्यास असलेल्या कोळी महादेव या अनुसूचित(आदिवासी) जमातीच्या लोकांनी बालाघाटच्या मूळ आदिवासी कोळी महादेव जमाती व मूलनिवासी सेवा व त्यांच्या रूढी, परंपरा, संस्कृती, जतन करण्यासाठी अनुसूचित जमाती संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या बालाघाट आदिवासी दिनदर्शिकेचा प्रकाश सोहळा चोरंबा येथील हनुमान मंदिरात मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष संभाजी बिल्पे वैद्यमापक निरीक्षक महाराष्ट्र राज्य,तर उद्घाटक
नगराध्यक्ष डॉ.स्वरूपसिंह हजारी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादेव बडे, माजी सभापती अर्जून तिडके, उपसभापती सुनील शिनगारे,संचालक अॅड.नवनाथ पांचाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा.ईश्वर मुंडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष अॅड.बालासाहेब चोले, माजी जि.प.सदस्य माणिक मंदे, रमेश चव्हाण, कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गोरख पुर्णे, महादेव रिड्डे,सखाराम वनवे, दादासाहेब घोळवे,सटवा अंडील,बालाजी गांधले,नितीन कांबळे,सुग्रीव मुंडे,रुक्मांगद मुंडे,अंगद बडे आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक आदिवासी कवी रामहरी वरकले यांनी आपल्या कवीतेने केले व सूत्रसंचालन आदर्श शिक्षक भगवान बिल्पे यांनी केले तर
आभार बालाघाट प्रतिष्टानचे अध्यक्ष आदर्श शिक्षक मुंजाबा निरडे यांनी केले.या कार्यक्रमास पंचक्रोशीतील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.
addComments
टिप्पणी पोस्ट करा