धर्माबाद (अहमद लड्डा)
धर्माबाद येथील ग्रामीण रूग्णालयात नवीन रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आमदार राजेश पवार यांच्या हस्ते पार पडला. कोरोना संकटाच्या वेळी आमदार राजेश पवार यांनी रुग्णालयाला रुग्नवाहिका भेट देण्याचे सांगितले होते आणि ती रुग्नवाहिका शनिवारी रुग्णालयास दिली गेली.लोकार्पण कार्यक्रमानंतर आमदार पवार म्हणाले की, गरिबांना वाचवण्यासाठी आपण पुढे आले पाहिजे. आरोग्य हा मानवासाठी महत्वाचा भाग आहे आणि त्या मार्गावर आरोग्यास महत्त्व दिले जाईल आणि त्या बरोबरच आरोग्य शिक्षण देण्याची ही गरज आहे. धर्माबाद येथील आरोग्य केंद्राचे काम कौतुकास्पद आहे. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीं रस्ते चांगले असणे गरजेचे आहे व त्यावर ही आम्ही लक्ष देणार आहोत. आपल्याला सर्व सामान्य लोकांना महत्त्व द्यायचे आहे, मग आपल्या कामाचा हेतू पूर्ण होईल आणि प्रत्येक कार्यात पत्रकारांचे कार्य महत्त्वपूर्ण आहे असे ही आमदार राजेश पवार म्हणाले. यांच्यासोबत उद्योजक सुबोध काकाणी, विजय डांगे, ग्रामीण रुग्णालय सदस्य व कृषी उत्पन्न बाजार समिति चे संचालक रमेश गौड, संचालक अशोक पाटील वडजे, डॉ इकबाल शेख, सुनील शिंदे,रवी शेट्टी, गोविंद पाटील रोशनगावकर, दत्ताहरी पाटील चोलाखेकर, अमित मुंदडा , गिरीधर बुंदेले, ढिल्लो, सज्जन गड्डोड, लक्ष्मण निदानकर, बाबुराव आलूरकर, प्रवीण बेल्लूरकर, पत्रकार सतीश शिंदे, पत्रकार संजय कदम आणि अहमद लड्डा उपस्थित होते. पत्रकार मिसाळे सर यांनी रुग्णांना होणाऱ्या अडचणींबद्दल सांगितले व सतिष शिंदे ने ही आपले मनोगत व्यक्त केले. ह्या कार्यक्रमास चक्रेश पाटील, साईनाथ शिरपुरे, नरसिंग पाटील नरवाडे, संपादक याहिया खान आणि गजानन चंदापुरे सोबतच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. ग्रामीण रुग्णालयातील डॉ. पोहरे, डॉ. पंडित आणि डॉ.म्याकलवार यांच्यासह रुग्णालयाच्या सर्व कर्मचार्यांनी परिश्रम घेतले. येथे पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.

COMMENTS