माजलगाव/प्रतिनिधी
गेल्या वर्षांपासून सिद्धीविनायक अर्बन माजलगाव तर्फे लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर घेतले जाते या ही वर्षी बारा डिसेंबर रोजी सकाळी नऊ वा. डॉ.प्रशांत पाटील यांच्या निवासस्थाना समोर गजानन नगर बायपास रोड माजलगाव येथे भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजलगाव मतदार संघाचे नेते रमेशराव आडसकर साहेब असणार आहेत व प्रमुख पाहुणे म्हणून मा.आमदार केशव दादा आंधळे, डॉ.प्रकाशराव आंदगावकर, नितीनराव नाईकनवरे व भाजपा माजलगाव तालुका अध्यक्ष अरुणराव राऊत हे असणार आहेत.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून भाजपा जिल्हा सचिव बबनराव सोळंखे, अमरनाथजी खुर्पे, ज्ञानेश्वर नाना मेंडके, डॉ.अशोकराव तिडके, ऍड.सुरेश दळवे, दिपकराव मेंडके, हनुमान कदम, मनोज जगताप हे असणार आहेत. तर या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टी माजलगावचे नेते, पदाधिकारी कार्यकर्ते व सिद्धीविनायक अर्बनचे संचालक व सभासद उपस्थित राहणार आहेत.
सध्या महाराष्ट्रात सर्वत्र रक्ताचा तुटवडा आहे त्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन सिद्धीविनायक अर्बनचे अध्यक्ष तथा भाजपा सहकार सेलचे प्रदेश सहसंयोजक डॉ.प्रशांत पाटील, संचालक तथा न.प. पाणीपुरवठा सभापती विनायक रत्नपारखी,संचालक तथा भाजपा सोशलमीडिया जिल्हा संयोजक दत्ता महाजन, संचालक निरंजन वाघमारे, कैलास जोशी, डॉ.स्वानंद कुलकर्णी, जगदीश साखरे, आनंद कुलकर्णी, डॉ.दिपक जोशी, संतोष देशमुख, राघवेंद्र शिर्षिकर, ऍड.दिपक देशमुख, गोरख मेंडके सदाशिवराव पत्की, संदीप वानरे, बाळासाहेब देशपांडे, कमलाकर देशमुख, संजय देशमुख डॉ.प्रकाश पाटील, रविंद्र पाटील, विठ्ठल कांबळे, ओम देशमुख व आयोजकांनी केले आहे.

COMMENTS