प्रशिक्षण पूर्ण न केलेल्यांना वरिष्ठ श्रेणी देण्याचे माननीय उच्च न्यायालयाचे आदेश. स्व.रामभाऊ कोसलगे माध्यमिक विद्यालय पोखरी. जिल्हा. यवतमाळ येथील सहाय्यक शिक्षक श्री पांडुरंग चव्हाण, शुद्धोदन पुनवटकर व कुमारी नयना उंचेकर यांना २०१० पासून वरिष्ठ श्रेणी चे लाभ देण्यात आले नव्हते व २०१४ पासून वेतनवाढी देण्यात न आल्याने त्यांनी ऍड. संजय उ. घुडे यांचे मार्फत माननीय उच्च न्यायालय नागपूर येथे रिट याचिका दाखल केली. मा.उच्च न्यायालय यांचे आदेशानंतर तीनही शिक्षकांना प्रतिमाह १६००० रूपये वेतनवाढ लागू करन्यात आली व पाच लाखांपर्यंतची थकबाकी मंजूर झाली. परंतु शिक्षणाधिकारी यांनी प्रशिक्षण पूर्ण न केल्याने तिन्ही शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी नाकारल्याने दिनांक 21 डिसेंबर 2020 ला सदर प्रकरण माननीय उच्च न्यायालयाच्या द्विखंडपिठापुढे सुनावणीस आले असता ऍड.संजय उ.घुडे यांनी मा.उच्च न्यायालयांच्या आदेशानंतर शिक्षणाधिकारी यांना वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण पूर्ण केले नाही या कारणास्तव वरिष्ठ श्रेणी नाकारण्याचे अधिकार नसल्याचे मान्य उच्च न्यायालय यांच्या निदर्शनास आणून दिल्यायानंतर मा.उच्च न्यायालयांनी शिक्षनाधिकारी यांना स्वतंत्र आदेश काढून वरिष्ठ श्रेणी मंजूर करण्याचे आदेश दिले त्यामुळे सदर शिक्षकांच्या वेतनात मा.उच्च न्यायालय यांच्या आदेशामुळे प्रतिमाह प्रत्येक शिक्षकास ₹२०००० पर्यंत वेतनवाढ व प्रत्येकी सात लाख रुपयांपर्यंत थकबाकी व्याजासाहित मिळणार असून मा.उच्च न्यायालय यांनी संस्था अध्यक्षाला दंड म्हणून पंधरा हजार सदर शिक्षकांच्या खात्यात जमा करण्यास लावले व संपूर्ण रक्कम व्याजासाहित मिळणार असल्याने ऍड.संजय उ.घुडे यांनी मा.उच्च न्यायालय यांच्या आदेशाचे स्वागत केले व प्रशिक्षण पूर्ण न केलेल्या सर्व शिक्षकांना न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली. या ऐतिहासिक निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत असल्याबद्दल ऍड. संजय घुडे यांनी समाधान व्यक्त केले.


COMMENTS