होय आम्ही शेतकरी गन्ना मास्टर टिमचे मार्गदर्शन शिबीर युसूफवडगांव येथे संपन्न..

     केज/प्रतिनिधी:- यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने धनेगावचे मांजरा धरण तुडुंब भरले असल्याने सहाजिकच ग्रीन बेल्टमध्ये ऊसाचे क्षेत्र वाढणार...


     केज/प्रतिनिधी:- यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने धनेगावचे मांजरा धरण तुडुंब भरले असल्याने सहाजिकच ग्रीन बेल्टमध्ये ऊसाचे क्षेत्र वाढणार आहे त्या अनुषंगाने केज तालुक्यातील युसूफवडगांव येथील एसएसके फार्मर प्रोड्युसर कंपनी तर्फे शेतकऱ्यांसाठी होय आम्ही शेतकरीच्या गन्ना मास्टर टिमचे ऊस उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन शिबीर आयोजित केले होते.

    धरण क्षेत्रात या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने मांजर धरण १००% भरले आहे.या धरणाचा वॉटर बॉक परिसर हा गीन बेल्ट म्हणुन ओळखला जातो त्यामुळे भागात यावर्षी ऊसाच्या क्षेत्रात नक्कीच वाढ होणार आहे.येथील शेतकऱ्यांनी सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसारखे ऊसाचे एक्करी ९० ते १०० टन उत्पादन घ्यावे यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एसएसके फार्मर प्रोड्युसर कंपनी तर्फे होय आम्ही शेतकरीच्या गन्ना मास्टर टीमच्या तज्ञांचे मार्गदर्शन शिबीर ठेवले होते यावेळी या टिमने नुसतेच मार्गदर्शन केले नाही तर त्यांनी प्रत्यक्षात शेतावर जाऊन एक्करी ९० ते १०० टन उत्पादनाचे बारकावे शेतकऱ्यांना समजावले.या तज्ञ टीम ने सुरू ऊस लागणीचा डोस कसा असा याचे सविस्तर असे मार्गदर्शन केले.

    शेतकऱ्यांनी गन्ना मास्टर तंत्रज्ञान- सुरू व पूर्व हंगामी ऊस पिकासाठी खतांची मात्रा लावण करताना बेसल डोस एक्करी १०० किलो डीएपी ५० किलो पोटॅश तर लावण केल्यानंतर ३० दिवसांनी ३० किलो युरीया ५० किलो पोटॅश तर लावण केल्यानंतर ६५ दिवसांनी जेठा मोडून घेतल्यानंतर ३ रा डोस टाकून घ्या.५० किलो १२/३२/१६५० किलो युरीया ५० किलो अमोनियम सल्फेट ५० किलो पोटॅश तर ७५ दिवसांनी ४था डोस सुक्ष्मअन्नद्रवे टाकून घ्यावा.१)झिंक सल्फेट:-१०किलो,२)फेरस सल्फेट:-१०किलो,३)मँगनीज:-        ५किलो,४)मैग्नेशियमसल्फेट:-२५किलो,)बोरॉन:-३किलो,६)गंधक:-१०किलो,७)सिलिकॉन पावडर:-८०किलो वरील सुक्ष्मअन्नद्रवे हे २५० किलो शेणखत किंवा,कारखान्याच्या मळी पासून तयार केलेले कंपोस्ट खत मध्ये मिसळून ८ दिवस भट्टी लावा आणि त्यांनंतर टाका.शेणखत किंवा कंपोस्ट खता मध्ये मिसळल्याने सुक्ष्मअन्नद्रवे  पिकांना चांगल्या प्रकारे उपलब्ध होतात.१०५ दिवसांनी बाळभरणी १०० किलो dap,१०० किलो युरीया,५० किलो पोटॅश तर १४० दिवसांनी मोठी बांधणी१०० किलो २४/२४/०,५० किलो युरीया,५० किलो अमोनियम सल्फेट,५० किलो पोटॅश तसेच ही खतांची मात्रा स्टॅंडर्ड दिली आहे. आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार यामध्ये बदल होऊ शकतो.यासाठी दर २ वर्षांंनी माती परीक्षण करून त्यानुसारच खतांचे नियोजन करावे.

     यावेळी डॉ.अंकुश चोरमुले,अमोल पाटील,विजय मगदूम,शरद आवटी या तज्ञ मंडळी शेतकऱ्यांना बहुमुल्य असे मार्गदर्शन केले.या प्रसंगी कंपनी चे चेअरमन शिवराज खरबड यांनी शेतकऱ्यांना संबोधित करताना सांगितले की "एसएसके फार्मर प्रोड्युसर कंपनी" फक्त एवढ्यावर न थांबता शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञाची टीम बांधावर घेऊन येत राहणार असुन परिसरातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कंपनी कटिबद्ध आहे.याप्रसंगी परिसरातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel