श्री क्षेत्र गिरनार* आज,२९ डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती आहे. यानिमित्ताने

 


श्री क्षेत्र गिरनार* आज,२९ डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती आहे. यानिमित्ताने गुजरात मधील श्री क्षेत्र गिरणारची माहिती दत्त भक्तांना निश्चितच प्रफुल्लित करेल....ब्रह्मा, विष्णू आणि महेश या देवांचा अंश हा श्री गुरुदेव दत्त मानला जातो. मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला भेट देण्याकरिता प्रामुख्यानं दक्षिण भारत ,महाराष्ट्र ,गुजरात या प्रांतातून भाविक गिरणार पर्वताला भेट देण्याकरिता येतात. गुजरात मधील जुनागड पासून पाच किलोमीटर अंतरावर श्री गिरीनार हा सर्वात उंच पर्वत आहे .समुद्रसपाटीपासून तीन हजार६६६ फुटावर हे स्थान आहे.

 गिरीनार भेटीची ओढ माझ्या मनाला खूप दिवसांपासूनच लागली होती.

     मी योजना आखायला सुरुवात केली .माझ्या आई-बाबांनाही मला गिरणार तीर्थयात्रेला घेऊन जाण्याची प्रचंड इच्छा होती.

   मुंबईहून दुपारीं साडेतीन वाजता आमचा प्रवास सुरू झाला. दुसऱ्या दिवशी दुपारच्या तीन वाजता आम्ही जुनागडला पोहोचलो. वाटेत जुनागढ वरून आम्ही चहा,साखर, मुगाची डाळ ,तूप ,रवा,घेऊन आम्ही रेवतक पर्वताकडे जायला निघालो.कारण वाटेत एका गृहस्थाने आम्हाला सांगितले होते मंदिराकडे जाताना चहा ,साखर घेऊन जावे.आश्रमाच्या वतीने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत अखंड अन्नदान चालू असते. चहा सुद्धा आश्रमातर्फेच उपलब्ध करून देतात. १०००० पायऱ्यावर चहा, पूर्ण जेवण उपलब्ध करून देणे हे अतिशय कठीण कार्य आहे. प्रचंड वारा, कडक ऊन, धुवांधार पाऊस अशा अतिशय विपरीत परिस्थितीत हे सर्वजण विना मोबदला अहोरात्र सेवा बजावत असतात. ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे. अनेकजणांच्या देणगीवर हि सेवा अखंड चालू असते. पण सध्या धुनिवर ठेवण्यासाठी पिंपळाचे लाकूड मिळणे कठीण जात आहे. पंचक्रोशीत फिरून पिंपळाचे झाड विकत घेऊन ते कट करून गिरनार पायथ्याशी आणले जाते व इथून स्थानिक माणसांकडून ते वर आणले जाते. त्यामुळे यासाठी बराच पैसा लागतो. मध्ये कुंड ,गायत्री मंदिर लागते.आम्ही दामोदर कुंडात हात-पाय स्वच्छ धुऊन डोक्यावर पाणी ओतून त्यानंतरच गिरीनार पर्वताचा दिशेने निघायला सुरुवात केली. पायथ्याशी असलेल्या सनातन धर्म शाळेत आम्ही गेलो तेथे अनेक जैन धर्मशाळा देखील आहेत. मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या एका धर्मशाळेत आम्ही मुक्काम करण्याचे ठरविले.

आम्ही घरातून सोबत नेलेले पदार्थ लाडू, मेथीचा थेपला खाऊन थोडा आराम केला. पाच वाजताच्या सुमारास आम्ही धर्मशाळेच्या डाव्या बाजूला रस्त्यावर अप्रतिम चहा प्यायलो. सौराष्ट्रची खासियत म्हणजे इथला घट्ट चहा. साखर जास्त गोड वा कमी सुद्धा नाही.अगदी प्रमाणातच. काही ठिकाणी चहात दालचिनी घातली जाते.

 रात्री खिचडी व अप्रतिम गोडकढी बेत होता. सकाळी पहाटे लवकर ५ वाजताच्या सुमारास स्नान आदी आटपून आम्ही गिरनार पर्वताकडे निघालो. गिरनार पर्वताच्या पायथ्याशी डोकं टेकवले. श्री गिरणार पर्वत हा अत्यंत पवित्र असा पर्वत आहे. तसे या पर्वताने महादेवाला वरदानच मागून घेतले आहे.म्हणून आजच्या युगात देखील अनेक साधू महात्मे , ३३ कोटी देव , श्री गिरीनार पर्वताची परिक्रमा करण्यासाठी करिता येतात.

 पायथ्याशी अनेक मंदिरे आहेत. त्यापैकी लंबे हनुमान. सुरुवातीला डाव्या बाजूला चडा वाव हनुमान मंदिर, उजव्या बाजूला मातेचे मंदिर आहे .शितला माता ,काल भैरव, गणपती अशी अनेक मंदिरे पायथ्याशी आहेत. पायथ्याशी असलेली मंदिरं रैवतक पर्वत चढण्या करण्याकरिता विशेष शक्ती प्रदान करतात. त्याच प्रमाणे तेथे जैन धर्माचे नेमिनाथ भगवान यांचे मंदिर आहे.मंदिर २२वे जैन तीर्थंकर नेमिनाथचे आहे. प्राचीन राजवाड्यामध्येच हे जैन मंदिर आहे. काळ्या पाषाणामधील नेमिनाथांची अतिशय सुंदर ,सुबक ,मोहक अशी नेमिनाथाची मूर्ती आहे. नेमिनाथ याच ठिकाणी अनेक वर्षे साधना करीत होते अन् हेच त्यांचे समाधिस्थान आहे. या मंदिरातून थोड्या पायऱ्या उतरल्यावर जैन धर्मातले पहिले तीर्थंकर आदिनाथांची भव्य आणि उंच प्रतिमा आहे .मृगी कुंड येथे महाशिवरात्रीला पाच दिवसांची जत्रा भरते. शिवरात्रीच्या मेळ्याला या कुंडाजवळ भगवान महादेव मंदिराच्या दर्शनाला १० ते १२ लाख लोक जमा होतात. मृगी कुंडातील सिध्दांचे स्नान हे यातील प्रमुख आकर्षण असते. अशी एक आख्यायिका आहे कि, स्वयं शिव या कुंडात स्नानासाठी येतात.

मृगी कुंडामध्ये नागा साधू स्नानाला जेंव्हा उतरतात, त्या साधूंमध्ये असा एक साधू असतो, की जो मृगी कुंडात डुबकी मारल्यावर बाहेर येत नाही. अंतर्धान पावतो. तोच स्वयं शिव असतो. त्याचप्रमाणे पांडव देखिल या डोंगरावर आले होते असा उल्लेख पुराणात आहे. डोंगर फार उंच असल्याकारणाने १० हजार पायऱ्या चढताना काठीचा आधार लागतो .त्यामुळे आम्ही काठी सोबत घेतली. डोली सेवा,अर्ध्यावर पर्यंत उडान कटोरा आहे . असे मानले जाते की डोंगर चढताना अहंकार ,लोभ, मोह यांचा लोप पावतो.

दत्ताने आपल्या भक्तांना पायऱ्या चढताना अहंकार,क्रोध लोभ,मोह अशा अनेक दुर्गुणांचा त्याग करण्यास सांगितले. त्यामुळे डोंगर चढणे सुलभ जाते . हळूहळू ४८००पायऱ्या चढल्यावर अंबाजी मातेचे मंदिर, हे ५१ शक्तिपीठामधील एक आहे. त्यानंतर ५५०० पायऱ्यांवर गोरक्षनाथाची लहान अशी गुफा आहे. पुढे भक्तांना थोडासा दिलासा मिळतो. हजार ते पंधराशे पायर्‍या उतरायला मिळतात. उजव्या हाताला गिरीनार बापू प्रसाद असतो. सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत, तिथे डाळ खिचडी आणि गोड शिरा प्रसाद मिळतो. बाजूला थोडे अंतर पुढे गेल्यावर दोन मोठ्या कमानी लागतात. उजव्या बाजूच्या कमानीतून सुमारे ३०० पायऱ्या उतरल्यावर श्री दत्तगुरूंचे कमंडलू स्थान आहे.पुढे आम्ही गिरिनार पर्वताच्या दिशेने निघालो.हळूहळू गिरीनार पर्वताकडे पोहोचलो . पवित्र असा गिरणार पर्वत, निरभ्र आकाश ,जणू ढगांना स्पर्श करतो. 

लेखिका - वर्षा वासुदेव भावसार. मुंबई.

मत आपले,विचार,सल्ला,

विचारल्या विण देऊ नका.

मान आपला आपण राखा,

   मंत्र मुळी हा सोडू नका.

   *ॐ श्री गुरुदत्तात्रेय*

*श्रीपाद श्रीवल्लभाय नमः !!*


नित्यच पाळा वेळा, 

सर्व वेळी अवेळी जागू नका .

पैश्याहुनही अमूल्य वेळा,

मंत्र मुळी हा सोडू नका.

 *ॐ श्री गुरुदत्तात्रेय*

*श्रीपाद श्रीवल्लभाय नमः !!*


नाही बोलले कुणी तरीही,

  वाईट वाटुन घेऊ नका.

   मौन साधते सर्वार्थाला,

  मंत्र मुळी हा सोडू नका.

   *ॐ श्री गुरुदत्तात्रेय*

*श्रीपाद श्रीवल्लभाय नमः !!*


जगलो केवळ इतरांसाठी,

    कुठेच आता गुंतू नका.

फक्त जगुया आपल्यासाठी,

    मंत्र मुळी हा सोडू नका.

   *ॐ श्री गुरुदत्तात्रेय*

*श्रीपाद श्रीवल्लभाय नमः !!*


जाणा कारण या जन्माचे,

वेळ व्यर्थ हा घालू नका.

श्वासोश्वासी नामच घ्यावे,

मंत्र मुळी हा सोडू नका.

    *ॐ श्री गुरुदत्तात्रेय*

*श्रीपाद श्रीवल्लभाय नमः !!*


  *🙏🌹 श्री गुरुदेव दत्त 🌹🙏*दत्तात्रेय*

*श्रीपाद श्रीवल्लभाय नमः !!*


  *🙏🌹 श्री गुरुदेव दत्त 🌹🙏*

लेखिका - वर्षा वासुदेव भावसार. मुंबई.

टिप्पण्या