माजलगावच्या इंडिया बॅंकेच्या दलिंदर कारभारातुन शेतक-यांना मोकळे करा

- बंदुकीच्या धाकावर शेतक-यांना रोखणे तर दलालांना मुक्त प्रवेश - पन्नास हजार रूपयांच्या फाईलला पाच हजार रूपये दिल्याशिवाय फाईल मंजुर होतच नाह...



- बंदुकीच्या धाकावर शेतक-यांना रोखणे तर दलालांना मुक्त प्रवेश

- पन्नास हजार रूपयांच्या फाईलला पाच हजार रूपये दिल्याशिवाय फाईल मंजुर होतच नाही

- या सर्व प्रकाराची चैकशी करा - तालुकाध्यक्ष अरूण राउत

माजलगाव/प्रतिनिधी 

            येथील नविन बसस्थानकासमोर असलेल्या स्टेट बॅंक आॅफ इंडियाच्या शाखेत दलिंदर कारभार चालला असुन बंदुकीच्या धाकावर शेतक-यांना रोखणे तर दलालांना मुक्त प्रवेश दिला जातो. पिककर्जाची पन्नास हजार रूपयांची फाईलला पाच हजार रूपये दलांलामार्फत घेतले जातात नाही तर फाईल मंजुर होतच नाही. त्यामुळे दिवसभर रांगेत उभाराहुन देखिल शेतक-यांच्या पदरी मात्र निराशाच पडत आहे. त्यामुळे या शाखेत होत असलेल्या गैरव्यवहाराची चैकशी होईपर्यंत स्टेट बॅंकेसमोर दि. 22 डिसेंबर रोजी अमरण उपोषण करण्याचा इशारा भाजपा तालुका अध्यक्ष अरूण राउत यांनी दिला आहे. 

  माजलगाव येथील नविन बसस्थानकासमोर असलेल्या स्टेट बॅंक आॅफ इंडियाच्या शाखेत गैरव्यवहार सुरू आहे. या शाखेत एकूण माफी मिळालेल्या शेतक-यांपैकी किती शेतक-यांचे पिककर्ज नाकारण्यात आलेले आहे, ज्यांचे पिककर्ज नाकारले आहे असे जवळपास बाराशे लाभार्थी ज्यांचे पिककर्ज नाकारले आहे. त्यांची फाईल बॅंकेत पडून असून त्यांना त्यांचे पिककर्ज नाकारले आहे हे अजून का सांगीतले नाही, पिक कर्ज कोणत्या कारणाने नाकारले हे जर त्यांना सांगीतलेच नाही तर शेतक-यांना त्याची माहिती कळणार नाही माहिती कळली नाही तर पिककर्ज लाभापासून अनेक शेतकरी वंचित राहणार आहेत.. याची पूर्ण जबाबदारी शाखाधिकारी संदीप कुमार व फिल्ड आॅफिसर बालाजी गोपतवाड यांची राहिल. कोरोनाच कारण देउन शेतक-यांना बॅंकेत येण्यास अडवणूक केली जाते परंतु काही दलाल हे सर्रासपणे बॅंकेत वावरतात त्यांना कोणत्या हक्काने बॅंक मॅनेजर बॅंकेत फिरू देतात. पिककर्जाच्या फाईल चार चार महिणे झाले दाखल केल्या परंतु बॅंक प्रशासन कागदपत्रे घेउन करतय तरी का काय परंतु याच शाखेने शेतक-यांना वेठीस धरून एजंटकडे दहा हजार रूपये दिले तर एजंट दोन दिवसात पिककर्ज मंजुर करून देतो आणि तीन दिवसात खात्याला पैसे पडतात. याबाबत बॅंक अधिकारी यांना जाब विचारला असता एजंट घेत असतील आम्हाला माहित नाही अशी उडवाउडवीची उत्तरे देतात. त्यामुळे या शाखेत होत असलेल्या गैरव्यवहाराची चैकशी होईपर्यंत स्टेट बॅंकेसमोर दि. 22 डिसेंबर रोजी अमरण उपोषण करण्याचा इशारा भाजपा तालुका अध्यक्ष अरूण राउत यांनी दिला आहे. 

शेतक-यांच्या पदरी रांगच, पैसे मात्र लांबच

साधे पैसे जमा करणे आणि काढण्यासाठी देखिल या शाखेत प्रवेश दिला जात नाही. नविन बसस्थनकापर्यंत रांग लागलेली असते त्यामुळे शेतक-यांच्या पदी रांगच, पैसे मात्र लांबच अशी परिस्थिती या बॅंकेत आहे.  

मागील वर्षीचे कर्जप्रकरणे प्रलंबित

या बॅंकेत 03.03.2019 या वर्षात सीएमईजीपी या योजनेअंतर्गत अनिता अलकुंटे, श्री. इनामदार, ज्ञानेश्वर गायकवाड यांना कर्जाचे मंजुरी पत्र देण्यात आलेले आहे. त्याला एक वर्षे लोटले आहे पण पन्नास हजार रूपयांचा इन्शुरन्स घ्या तरच कर्ज मंजुर होईल अन्यथा होणार नाही अशी अट घातली असल्यामुळे हे कर्जप्रकरणे व असे अनेक कर्जप्रकरणे बॅंकेने प्रलंबित ठेवली असल्याने शेतक-यांसह सर्वसामान्य मानसाची कामे खोळंबली आहेत.



मागील दिड वर्षांपासुन गु-हाळ सुरू करण्यासाठी बॅंकेत कर्जासाठी फाईल टाकलेली आहे. पन्नास चकरा मारूनही प्रकरण मंजुर केले नाही आणि आता तुमची फाईल सापडत नाही असे उडउडवीची उत्तरे मिळाल्यामुळे खाजगी सावकारांकडुन कर्ज काढुन गु-हाळ सुरू केले आहे. - प्रकाश जाधव, केसापुरी.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel