आष्टी (दादासाहेब बन
दरवर्षीप्रमाणे वकील संघाच्या वतीने निवडणुकी संदर्भात बैठक संपन्न झाली. आष्टी वकील संघाच्या अध्यक्षांचा कार्यकाळ संपल्यामुळे नवीन कार्यकारिणी निवड करणे करण्याकरिता बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीमध्ये निवडणूक न घेता बिनविरोध कार्यकारणी निवड करण्याचा ठराव संमत करण्यात आला पहिल्यांदा अध्यक्षपदासाठी अँड. महादेव तांदळे यांचे नाव सुचविण्यात आले त्यांना कुणीही विरोध न करता त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्षपदी अँड राम मुटकुळे, सचिव पदी अँड अजय जोशी, कोषाध्यक्षपदी अँड संभाजी दहातोंडे महिला प्रतिनिधी अँड नेहा निकाळजे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अँड काशिनाथ फुंदे, अँड साहेबराव म्हस्के,अँड बी. एम गर्जे, अँड एस के गव्हाणे, अँड के एन गव्हाणे, अँड आदिनाथ पोकळे, अँड अनारसे, अँड सय्यद ताहेर, अँड पारखे,अँड विजय ढोबळे, अँड अविनाश निंबाळकर, अँड झांबरे,अँड व्ही. एच.शेकडे, अँड ए.बी.शिंदे ऍड एस.टी.देशपांडे यांनी परिश्रम घेतले. या बैठकीला वकील संघांचे सदस्य अँड लगड, अँड झगडे,अँड डी. एस. ससाणे, अँड अस्वर, अँड गवारे, अँड तवले,अँड घुले,अँड रियाज शेख,अँड दाणी, अँड खिल्लारे, अँड नरवडे,अँड घोलप, अँड डी. सी. शेख, अँड बाळासाहेब मोरे, अँड बी.बी. गर्जे, अँड इरफान पठाण, अँड गौतम निकाळजे, अँड शार्दुल जोशी, अँड यु.आर. पोकळे, अँड कुलकर्णी, अँड टी. एच. सय्यद,अँड नवनाथ शेकडे, अँड मोहिते, अँड किशोर निकाळजे,आदी सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाची प्रस्तावना वकील संघांचे मावळते अध्यक्ष अँड विनोद निंबाळकर यांनी केले. तसेच सूत्रसंचालन अँड एस. बी. पवार यांनी केले. शेवटी आभार अँड झांबरे यांनी मानले.

COMMENTS