रमेश इतापे केज/प्रतिनिधी.
केज : मुख्य रस्त्यावर उभ्या असणाऱ्या टॅक्टर च्या ट्रॉलीजना मागील बाजूस रिफ्लेक्टर नसल्याने अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागतो. यासाठी केज तालुक्यातील सर्व ट्रॅक्टर्स ट्रॉलीजना केज रोटरीच्या वतीने रिफ्लेक्टर बसविण्याची मोहीम हाती घेतली असून बुधवारी सकाळी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक व भवानी चौक येथे पन्नासहून अधिक ट्रॅक्टर्स ट्रॉलीजनां रिफ्लेक्टर बसविण्यात आले.
मुख्य मार्गावर अनेक ठिकाणी कांही अचानक झालेल्या बिघाड किंवा इतर कारणास्तव ऊस, वाळू किंवा इतर मालाने भरलेल्या ट्रॉलीज रस्त्यावरच सोडल्या जातात. या ट्रॉलीजनां मागील बाजूस रिलेक्टर्स नसल्याने मागून येणाऱ्या वाहनास पुढे असणारी ट्रॉली दिसून न आल्याने अपघात होऊन वाहचालकांचे व विशेषतः दुचाकी वाहन चालकांचे जीव जातात. ट्रॅक्टर मालक आपल्या व्यवसायासाठी लाखो रुपयांचे ट्रॅक्टर व ट्रॉली खरेदी करतात परंतु दरवर्षी केवळ पंचेवीस रुपयांचे रिफ्लेक्टर बसवत नाहीत ज्यामुळे लोकांचे बळी जातात. यासाठी केज रोटरीच्या वतीने दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो. यावर्षी केजचे तहसीलदार व परिसरातील ऊस कारखाने चेअरमनला पत्र देऊन रिफ्लेक्टर नसलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीज धारकांवर रिफ्लेक्टर बसविण्याची सक्ती करण्याची मागणी केली जाणार आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी रो हनुमंत भोसले, धनराज पुरी, प्रवीण देशपांडे,महेश जाजू, दादासाहेब जमाले पाटील, अरुण अंजान, संजय पैठणकर, प्रकाश कामाजी, बापूराव सिंगण, भीमराव लोखंडे इत्यादी रोटरी सदस्यांनी परिश्रम घेतले.

COMMENTS