नांदेड (विठ्ठल कल्याणपाड)
मुखेड शहरातील शनिदेव मंदिराजवळ रहिवाशी असलेल्या युवकाला बहिणीला पळवून आणल्याचा राग धरून धारदार शस्त्राने छातीत वार करून खुन केल्याची घटना दि. ३ डिसेंबर रोजी घडली
अधीक माहिती अशी की मयत सय्यद सलीम सय्यद फकीर २० वर्ष यांनी आरोपी सय्यद शादुल सय्यद युसुफ २१ वर्ष याच्या बहिणीशी प्रेम संबंध जुळले असता हे एकमेकाच्या सहमतीने पळून गेले. याचाच राग मुलीचा भाऊ सय्यद शादूल मनात धरून दि. ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ८ वायता सय्यद सलीम सय्यद फकीर यांना शनिदेव मंदिराच्या बाजूस त्यांच्या पालीत वजाऊन धारदार हात्याराने छातीत वार केला केला असल्याचे फिर्यादी सय्यद फकीर नुर अहेमद यांनी फिर्यादित नमूद केले
या फिर्यादीवरून आरोपी सय्यद शादुल सय्यद युसुफ यास पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुरनं. ३९० / २०२० कलम ३०२ भादवी प्रमाणे मुखेड पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक एन. एल. रिठ्ठे व पो.ना. व्यंकट जाधव हे करीत आहेत.

COMMENTS