महेंद्र पुरी, जिल्हा प्रतिनिधी हिंगोली
हिंगोली जिल्ह्यातील वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याला सपोनी अशोक जाधव यांच्या नंतर पुन्हा एकदा एका कर्तबगार अधिकारी यांची नियुक्ती झाली असुन वसमत ग्रामीण ठाण्याचा पदभार सपोनी विलास चवळी यांनी घेताच अवैध धंद्यावर कारवाईचा बडगा त्यांनी उगारला आहे. ज्यामुळे अवैध धंदेचालकांचे धाबे दणाणले आहेत.
वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात एका महिन्यापुर्वी रूजु झालेले कर्तबगार सहाय्यक पोलिस निरिक्षक विलास चवळी यांनी ठाण्यात रूजु होताच नांदेड परिक्षत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी व पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या आदेशाचे पालन करीत पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यावर कारवाई करत एका महिन्यात अवैध दारू, जुगार, अवैध प्रवासी वाहतुक,अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करत 2 लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच ठाण्यात दाखल झालेले गुन्हे प्रलंबीत राहू नये यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांना सुचना करत गुन्हे निकाली काढण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेत आहेत. सपोनी विलास चवळी यांनी या अगोदर नाशिक ग्रामीण व नगर मध्ये कार्यरत असतांना उत्कृष्ट कर्तव्य पार पाडले आहे. वसमत ग्रामीण ठाण्याचे हद्दीत चोरीच्या घटनेला आळा घालण्यासाठी रात्रीची गस्त वाढवली आहे. ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गावांमधे सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष पोलिस पाटलांशी समन्वय राखत, गावातील लहान मोठी तंटे गावातच मिटविण्यासाठी सपोनी चवळी परिश्रम घेत आहेत. हिंगोली चे पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी वसमत ठाण्यात एका कर्तबगार पोलिस अधिकारी यांची नियुक्ती केल्याने पोलिस ठाण्याचे हद्दीतील गावांमधे उत्साहाचे वातावरण आहे.

COMMENTS