नांदेड (विठ्ठल कल्याणपाड)
मुखेड तालुकयातील उपक्रमशिल शिक्षक तसेच मोहनावती शिक्षक पतपेढी विद्यमान सचिव राम कोंडीबा जाधव होनवडजकर यांची शिक्षकसेना मुखेडच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोषजी अंबुलगेकर, सचिव रवि बंडेवार, मार्गदर्शक संजय कोटगीरे,संघटक अरुण भारदे,कार्याध्यक्ष मनोहर भंडेवार,मराठवाडा सहसचिव विठ्ठल देशटवाड,कोषाध्यक्ष गंगाधर कदम ,सहसचिव सचिन रामदिनवार,यांच्या हस्ते नियुक्ती प्रमाणपत्र देऊन निवड करण्यात आली.श्री राम जाधव हे अत्यंत उपक्रमशिल,विद्यार्थीप्रिय व शाळेविषयी जिव्हाळा असणारे शिक्षक आहेत.सध्या ते जि.प.प्रा.शाळा मेथी येथे मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत.तसेच मोहनावती पतसंस्था मुखेडचे विद्यमान सचिव आहेत.सध्या कोरोनाच्या काळामध्ये नियमितपणे varctul class room च्या माध्यमातुन online तासीका घेतात.त्यांच्या निवडीमुळे शिक्षक सेनेमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.त्यांच्या निवडीबद्दल विस्तार अधिकारी श्री व्यंकटराव माकणे, केंद्रीय मु.अ.मनोहरराव जाधव,शेखसर,शिक्षक नेते शिवाजीराव इंगोले,माधव माधसवाड,शरद डावकरे,बळवंत डावकरे,गजानन पवितवार,कार्याध्यक्ष पद्माकर जवळदापके,सचिव रविकुमार कामन्ना,कोषाध्यक्ष मारोती लंगोटे,संघटक माधव उलीगडे,संदीपकुमार पेंडलवार,हाळेसर,डी.व्ही.बिरादार,केंद्रेसर,भरत जाधव, यासह अनेक शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS