माजलगाव/प्रतिनिधी
दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी विरोधी विधेयकाच्या विरोधातील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाच्या मागण्या मान्य करा या मागणीसाठी माजलगाव तालुक्यातील सर्वपक्षीय शेतकरी बचाव कृती समितीच्या वतीने 5 डिसेंबर 2020 रोजी दुपारी बारा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून तहसील कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढण्यात आला या मोर्चात शेतकरी विरोधी कायदे रद्द करा. दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्या त्वरित मान्य करा. आदि घोषणा देत मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. तहसील कार्यालयासमोर मोर्चा आल्यानंतर शेतकरी बचाव कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चेकरयांना मार्गदर्शन केले व दिल्लीतील आंदोलनाची मोदी सरकारने दखल न घेतल्यास जिल्हाभरात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे या आंदोलनात शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष माकपाचे कॉम्रेड मुसदिक बाबा सर, शेतकरी बचाव कृती समिती चे उपाध्यक्ष शेकापचे भाई एॅड. नारायण गोले पाटील, वंचित चेअंकुशराव जाधव, शेतकरी बचाव कृती समितीचे सचिव धम्मानंद साळवे, सहसचिव अमित नाटकर, एॅड.सय्यद याकूब यांच्यासह शेकापचे लहु सोळंके, सिद्धेश्वर गायकवाड, सुदाम चव्हाण, संभाजी चव्हाण, राजेभाऊ घोडके, समाधान पौळ,मुंजा पांचाळ, अजय दांगट, नितीन झोडगे, शेषराव अबुज, सिटूचे शिवाजी कुरे,काँग्रेसचे शेख अहेमद, हरिभाऊ सोळंके, शेख रशीद, एम आय एम चे इदरीश पाशा, युसुफभाई मौलाना आझाद चे नुमान चाऊस, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रशांत बोराडे, एस एफ आय चे कॉम्रेड सुहास झोडगे, किसान सभेचे कॉम्रेड विनायक चव्हाण, भगवान पवार, सुदर्शन हिवरकर, शेख मेहबूब, मुस्तकीन, सय्यद फारुक, सय्यद रफिक,वंचित युवा आघाडीचे संदीप फंदे, बाळासाहेब गायसमुद्रे, शत्रुघन कसबे, संभाजी ब्रिगेडचे विजय दराडे पांडुरंग गोंडे यांच्यासह हजारो शेतकरी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते निवेदना पूर्वी दिल्ली येथे आंदोलनात हुतात्मा झालेल्या शेतकरी नेते यांना श्रद्धांजली वाहून अभिवादन करण्यात आले.

COMMENTS