केज,(प्रतिनिधी)
अजूनही शहरासह ग्रामीण भागात कोरोना चा संसर्ग थांबलेला नसून, त्याचा आलेख वाढतच चालला आहे .आरोग्य विभागाने जनतेला तोंडाला मास्क बांधावे, सामाजिक अंतर ठेवावे,वेळोवेळी साबनाने हात धुवावे, सँनिटाईजरचा वापर करणे आशा विविध प्रकारची काळजी घ्यावी असे आवाहन केले जात आहे. परंतु या सर्व गोष्टींचे पालन जनता करताना दिसत नसल्याचे केज येथील ग्रामीण रुग्णालयात दिसुन येत आहे.
कोरोनाचा संसर्ग टाळायचा असेल तर वरील गोष्टीचे पालन करणे गरजेचे असताना देखील ऊपजिल्हा रूग्णालय केज येथे महिलांची व पुरुषांची गर्दीच गर्दी दिसत आहे.
दवाखान्यामधील रांगेमध्ये कसल्याच प्रकारचे सामाजिक अंतर दिसत नाही , ही परिस्थिती पाहून या रुग्णालयाचे अधीक्षक यांचे कसल्याच प्रकारचे दवाखान्यावर लक्ष नसल्याचे दिसत असून नियोजन शून्य असल्याचे दिसत आहे.
त्यामुळे
वरिष्ठ अधिकारी यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

COMMENTS