दिंद्रुड प्रतिनिधी
माजलगाव तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेले गाव म्हणूनच दिंद्रुड सर्वश्रुत आहे येथील पोलीस स्टेशन ला पोलीस उपनिरीक्षक विजेंद्र नाचण यांना परत रुजू करण्याची मागणी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिंद्रुड ग्रामस्थांनी केली आहे.
माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस स्टेशन अंतर्गत दिंद्रुड, मोगरा, नित्रुड, चोपनवाडी या ग्रामपंचायतीचे निवडणूक येत्या 15 जानेवारी ला संपन्न होणार असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहेत. कोरोना टाळेबंदी च्या काळात दिंद्रुड पोलीस स्टेशन अंतर्गत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक विजेंद्र नाचन व पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे गेल्या काही महिन्यांपूर्वी बीड येथे नाचण यांची बदली करण्यात आलेली असून ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता विजेंद्र नाचन यांना परत दिंद्रुड पोलीस स्टेशनला रुजु करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.

COMMENTS