ग्रामपंचायत निवडणूकीत उमेदवारांना २५ ते ७५ हजार पर्यंत खर्च मर्यादा उमेदवारांना दैनंदिन खर्चाची निवडणूक विभागाला दररोज द्यावी लागणार माहिती -तहसिलदार शारदा दळवी

आष्टी:दादासाहेब बन-

कोरोना विषाणूंच्या संकटामुळे लांबलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका जवळपास चार महिन्यानंतर होत आहे.या ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांना २५ ते ७५ हजार रुपयांपर्यतचा खर्च करता येणार असून,निवडणूकीत उमेदवारांना दैनंदिन केलेल्या खर्चाची माहिती दररोज निवडणूक विभागाला देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन तहसिलदार श्रीमती शारदा दळवी यांनी केले.

           तालुक्यातील बारा ग्रामपंचायतीचे निवडणूक दि.१५ जानेवारीला मतदान होणार असून १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे.यामुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापले आहे. निवडणुकीची गणिते जुळविण्याची रणनीती आखणे सुरू झाले आहे.या निवडणुकीत वरिष्ठ पातळीवरील नेत्यांकडून दखल घेण्याची शक्यता आहे.या ग्राम पंचायती ताब्यात मिळविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे.यंदा सरपंचाची निवडणूक थेट जनतेतून होणार नसून पारंपरिक पद्धतीने म्हणजे सदस्यांमधून होणार आहे. ही निवडणूक गावापुरती मर्यादेत असली तर मोठ्या प्रमाणात खर्च होतो.या निवडणुकीत उमेदवारास २५ ते ७५ हजार रुपयेपर्यंतचा खर्च करता येणार आहे. या मर्यादेपेक्षा जास्त पैसा खर्च करणाऱ्याचे सदस्यत्व धोक्यात येईल.आरक्षित वर्गातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारास जात वैधता प्रमाणपत्राकरिता अर्ज केल्याची पोहचपावती नामांकन पत्र दाखल करताना जोडावी लागणार आहे.अशी असेल खर्च मर्यादा ७ ते ९ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीला २५ हजार रुपये तर ११ ते १३ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीला ३५ हजार रुपये १५ ते १७ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीला ७५ हजार रुपये खर्च मर्यादा असून,प्रत्येक उमेदवाराने अर्ज दाखल केलेल्या दिनांकापासून निकाल लागेपर्यंतचा दैनंदिन खर्च निवडणूक विभागाकडे सादर करावे जर या दैनंदिन खर्च सादर केला नाही तर उमेदवारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही तहसिलदार शारदा दळवी यांनी दिला आहे.

टिप्पण्या
Popular posts
23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये*
इमेज
मुंबई पोर्ट ट्रस्टमधील सामाजिक कार्यकर्ते सतीश तुपे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार*
इमेज
तब्बल ३८ दिवस चोवीस तास कार्यालयात मुक्काम ठोकणाऱ्या धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांचा भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार
इमेज
नांदेड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना (जुक्टा) कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा जाहीर सत्कार
इमेज
*अन्याया विरूद्ध संघटीत व्हा! सचिन अहिर यांचे कामगार दिनानिमित्त कामगारांना आवाहन*
इमेज