खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांनी केले गलांडे परिवाराचे सांत्वन


प्रतिनिधी । केज 

दि.27 : केज तालुक्यातील चिंचोलीमाळी येथील भाजपचे जेष्ठ नेते सुनील आबा गलांडे यांच्या चार भावांचे सहा महिन्यांत वृद्धापकालीन आजारामूळे निधन झाले होते. यापैकी जेष्ठ बंधू कै.वसंतराव गलांडे यांच्या दहाव्याच्या कार्यक्रमात रविवारी खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांनी श्रीकृष्ण मंदीर, चिंचोलीमाळी येथे गलांडे परिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. कै. वसंतराव गलांडे पाटील यांचे दि.18 / 12/2020 रोजी रात्री 11 वाजता वृद्धापकालीन आजारामूळे निधन झाले होते. महानुभाव पंथाच्या रितीरिवाजा प्रमाणे त्यांच्या दहाव्याचा कार्यक्रम रविवारी श्रीकृष्ण मंदीर येथे झाला.यावेळी बीडच्या खा.डॉ प्रितमताई मुंडे यांनी चिंचोलीमाळी येथे येऊन कै. वसंतराव गलांडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहीली.त्या नंतर महानुभव पंथाच्या रितीरिवाजा प्रमाणे भगवदगितेच्या 15 व्या अध्यायायाचे पठण करण्यात आले. याप्रसंगी, माजी आमदार केशवदादा आंधळे, भाजपाचे तालुका अध्यक्ष भगवान केदार, पं.सं.चे सभापती पती विष्णू घुले, हे त्यांच्या सोबत होते. यावेळी श्रीमती निलावती गलांडे, रमेशदादा गलांडे, गुणवंत गलांडे, पंडित गलांडे, सरपंच सुनील देशमुख, शिवाजीआबा गायकवाड, शहाजी गलांडे, प्रकाश राऊत, राम मेजर राऊत, दगडू दळवे, डॉ अक्षय कदम, शिरुरकर अप्पा, अॅड. भुजंग गलांडे, दगडूबप्पा गलांडे, पांडुरंग गलांडे, मालोजी गलांडे , चंद्रकांत गलांडे , सुरेश गलांडे ,अॅड. श्रीकांत गलांडे, अशोक कदम , बाळासाहेब मोटेपाटील,सदाशिव पाटील, डॉ. उमाकांत गलांडे, दिलीप गायकवाड, सेवानंद गलांडे, अविनाश सोळंके, प्रमोद देशमुख, दयानंद चव्हाण, नितीन गलांडे, विलास गिरी, चंद्रकांत भुजबळ, रावसाहेब गलांडे, याच्यासह नागरिक उपस्थित होते.

टिप्पण्या
Popular posts
23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये*
इमेज
मुंबई पोर्ट ट्रस्टमधील सामाजिक कार्यकर्ते सतीश तुपे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार*
इमेज
नांदेड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना (जुक्टा) कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा जाहीर सत्कार
इमेज
तब्बल ३८ दिवस चोवीस तास कार्यालयात मुक्काम ठोकणाऱ्या धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांचा भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार
इमेज
*अन्याया विरूद्ध संघटीत व्हा! सचिन अहिर यांचे कामगार दिनानिमित्त कामगारांना आवाहन*
इमेज