केज प्रतिनिधी.
परीक्षा पद्धतीमध्ये काळानुरुप होणारे बदल विद्यार्थी व प्राध्यापकांनी स्वीकारून आपल्या ज्ञान अद्यावत ठेवून शिक्षण क्षेत्राचे अस्तित्व टिकवले पाहिजे, असे प्रभारी कुलगुरू प्रा मधुकर गायकवाड यांनी मांडले. ते सरस्वती महाविद्यालय केज व लोकमान्य टिळक महाविद्यालय वडवणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चेंजिंग नेचर ऑफ इव्हॅल्युएशन मेथड्स इन हायर एज्युकेशन या विषयावरील राष्ट्रीय वेबिनार प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ के एम पवार होते. यावेळी प्रा अशोक तेजनकर, प्रा अनिल बनकर, प्राचार्य डॉ गौतम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा बनकर म्हणाले, मुंबई विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षा यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. याचा आदर्श महाराष्ट्रातील इतर विद्यापीठाने घेणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. प्रा तेजनकर म्हणाले, शैक्षणिक क्षेत्रात होणारे परिवर्तन व परीक्षा पद्धतीत होणारे बदल हे विद्यार्थ्यांनी आत्मसात करून स्वतःला सज्ज केले पाहिजे असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ पवार यांनी महासंकटामुळे निर्माण झालेल्या समस्येवर मात करण्यासाठी विद्यार्थी व प्राध्यापक यांनी शिक्षण क्षेत्रातील तांत्रिक बदल स्वीकारून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ बी जी कुलकर्णी तर आभार प्रा दत्तात्रय रामरूले यांनी मानले. या राष्ट्रीय वेबिनार मध्ये विद्यार्थी व प्राध्यापक यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
COMMENTS