धर्माबाद (अहमद लड्डा) खेळाडूनां हक्काचे मैदान मिळावे ह्यासाठी राज्य शासनाकडून प्रत्येक तालुक्यात क्रीड़ा संकुल बांधन्यात आहे. त्यांच्याच एक भाग धर्माबाद तालुका क्रीड़ा संकुल चे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच धर्माबाद व परिसरातील खेळाडूसाठी खेळण्यासाठी उपलब्ध होईल अशी ग्वाही जिल्हा क्रीड़ा अधिकारी श्री राजेश्वर मारावार यांनी दिली आहे .धर्माबाद क्रीड़ा संकुल चे अंतिम टप्प्याचे काम पाहण्यासाठी क्रीड़ाधिकारी श्री
राजेश्वर मारावार यांनी धर्माबाद ला आले होते. त्यांच्या सोबत तालुका क्रीड़ा अधिकारी श्री किशोर पाठक व किनवट चे क्रीड़ा शिक्षक कृष्णा परिवाले होते. क्रीड़ा संकुल येथे राष्ट्रीय खेळाडू शेख शब्बीर,संतोष आनेराव व शिवाजी गोस्कुलवाड, क्रीड़ा शिक्षक साजिद अंसारी,तालुका क्रीड़ा संयोजक अहमद लड्डा, माजी नगरसेवक शेख शादूल मौलाना आणि गुत्तेदार इफ्तेखार अली उपस्थित होते. व त्यांनी नांदेड़हुन आलेल्या सर्व अधिकारी यांचे स्वागत केले.येथील क्रीड़ा संकुल चे काम पाहुन क्रीड़ा अधिकारी राजेश्वर मारावार व तालुका क्रीड़ा अधिकारी किशोर पाठक यांनी समाधान व्यक्त केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन च्या काळात संकुल चे काम बंद ठेवण्यात आले होते.आता अनलॉक मध्ये हे काम पुन्हा सुरु झाले असून हे काम प्रगतीपथावर असून अंतिम टप्प्यात आले आहे. जानेवारी 2021 मध्ये हे संकुल खेळाडूनां खेळण्यासाठी उपलब्ध होईल अशी माहिती समोर येत आहे.जवळपास ह्या संकुल चे पूर्ण झाले असून, 200 मीटर ट्रैक चे काम सुरु आहे,विद्युतीकरन व प्रवेश द्वार चे काम शिल्लक आहे व ते येत्या पंधरा दिवसात पूर्ण होईल अशी माहिती आहे.

COMMENTS