हिंदू धर्मगुरू दशनाम गोस्वामी आखाडा (कार्यक्षेत्र भारत ) या संघटनेच्या हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुकाध्यक्ष पदि रघुनाथ भारती तर सोशल मिडिया प्रमुख पदी सतीश गिरी यांची निवड रविवारी वसमत येथे करण्यात आली
हिंदू धर्मगुरू दशनाम गोस्वामी आखाडा संघटनेचे राष्ट्रीय महामंत्री तथा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. कृष्णदेव गिरी, राज्य महामंत्री संदीप गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उपाध्यक्ष व्यंकटेश पुरी यांच्या सुचने वरून संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष महेंद्र पुरी, हिंगोली जिल्हाध्यक्ष विठ्ठल गिरी, जिल्हा उपाध्यक्ष सतीश पुरी यांनी रविवारी वसमत तालुकाध्यक्ष व सोशल मिडिया प्रमुख यांना नियुक्तीचे पत्र दिले. यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थिती होती. त्यांच्या निवडीबद्दल गोसावी समाज बांधवांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. लवकरच वसमत तालुका कार्यकारणीतील उर्वरित पदाधिकारी यांची निवड करण्यात येणार असल्याचे नुतन नुतन तालुकाध्यक्ष रघुनाथ भारती यांनी सांगितले. यावेळी गजानन गिरी, राजेश गिरी, उमेश पुरी, अवधुत पुरी, मंगेश गिरी, उत्तम गिरी, संतोष गिरी, रामेश्वर गिरी, दत्ता भारती, माधव भारती, श्रीराम पुरी, दत्ता महाराज, शेषराव गिरी, नवनाथ गिरी, साईनाथ गिरी, अभिमन्यू गिरी, शिवा गिरी, दत्ता गिरी यांच्यासह समाज बांधव उपस्थिती होती.

COMMENTS