पद्मगंगा फाउंडेशनचा राज्यस्तरीय पुरस्कार वीरभद्र मिरेवाड यांना जाहीर

 नायगाव प्रतिनिधी रामप्रसाद चन्नावार 

नायगांव येथील सुप्रसिद्ध साहित्यिक कवी वीरभद्र मिरेवाड यांच्या "माती शाबूत राहावी म्हणून.." या कवितासंग्रहाला पद्मगंगा फाउंडेशन अहमदनगर येथील राज्यस्तरीय उत्कृष्ट पुरस्कार जाहीर झाला आहे .रोख रक्कम, सन्मानचिन्ह ,प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी प्राचार्य डॉक्टर धोंडीराम वाडकर यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.

वीरभद्र मिरेवाड यांना यापूर्वी संकेत प्रकाशन चा उत्कृष्ट वाड्.मय पुरस्कार प्राप्त झाला होता.

" माती शाबूत राहावी म्हणून .."या त्यांच्या कवितासंग्रहावर प्रा.डॉ. बाळासाहेब लबडे (गुहागर), प्रा.डॉ. फुला बागुल, (शिरपूर, धुळे) डॉ. अशोक कौतिक कौळी (जळगाव) डॉ. भाऊसाहेब मिस्तरी (औरंगाबाद), प्रा. व्यंकट सोळंके (नांदेड), डॉ. अनंता सूर (यवतमाळ) ,बाबाराव विश्वकर्मा, सौ.नंदा देशमुख या मान्यवरांनी समीक्षा केली आहे नुकताच भि.ग. रोहमारे पुरस्कार कमिटीने "माती शाबूत राहावी म्हणून.." या ग्रंथाचा विशेष काव्यसंग्रह म्हणून उल्लेख केलेला आहे. त्यांच्या या यशाबद्दल डॉ.ज.पा. खोडके, डॉ. माधव पुटवाड,प्रदीप धोंडीबा पाटील, ऋषिकेश देशमुख,पञकार रामप्रसाद चन्नावार . श्याम गायकवाड.साहेबराव धसाङे. अनिल कांबळे.माधव धङेकर. लक्ष्मण मलगिरवार,पांडुरंग पुठ्ठेवाड त्रंबक स्वामी नांदगावकर हणमंत वानोळे यासह अनेकांनी कौतुक केले.

टिप्पण्या