कुंटूर तांडा येथील रस्त्यावर बैलगाडीला मोटारसायकस्वाराची समोरासमोर धडक मोटारसायकलस्वार जागीच ठार


 (नायगांव / प्रतिनिधी रामप्रसाद चन्नावार)

 नायगांव तालुक्यातील कुंटूर सर्कल मधील कुंटूर तांडा येथील रस्त्यावर बैलगाडी उभी असलेल्या बैलगाडीला मोटरसायकलवर जात असणाऱ्या इसमांनी धडक दिल्याने जबर मार लागल्यामुळे व बैलगाडीची राड डोक्यात व तोंडात छातीत शिरल्याने जागीच एका 55 वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू झाला आहे .सदर घटना कुंटूर ते कुंटूर तांडा जवळ राञी सात वाजता च्या सुमारास घडली आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या बैलगाडीला नायगांव कडून येत असलेल्या मोटरसायकलवरील पहिलवान माधवराव मोहनराव पाटील बेलकर वय वर्ष 55 राहणार बळेगाव तालुका नायगांव यांनी येत असताना उभा असलेल्या बैलगाडीला टक्कर लागली त्यामुळे त्यांच्या तोंडात व शरीरामध्ये पूर्ण बैलगाडीचे राड घुसले असल्यामुळे जागीच मृत्यू झाला आहे .त्यांच्या या अपघातामुळे परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मयत माधवराव पाटील बेलकर हे बळेगाव व परिसरातील पहिलवान म्हणून नामांकित होते. त्यांचे आजोबा पिढीपासून पैलवान की असल्याचे बोलल्या जाते .व तेही पैलवान होते सध्या नायगांव येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या कामासाठी जाऊन परत येत असतांना रस्त्यात हा अपघात झाला व त्यांच्यावर दुःखाचा घाला झाल्याची परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त करत आहेत .सदर घटना ही राञी सात वाजता कुंटूर तांडा येथील रस्त्यावर झालेली असताना कुंटूर तांडा येथील नागरिकांनी पोलीस स्टेशनला फोन करून त्यांना त्यांची संपुर्ण माहिती दिली आहे. अशी माहिती कुंटुर पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक करीम खाँ पठाण यांनी सांगितले आहे.

टिप्पण्या