जिल्हा प्रतिनिधी महेंद्र पुरी हिंगोली
हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासुन अवैध वाळू उपसा बिनदिक्कत सुरू आहे. बुधवारी मध्यरात्री गोपनीय माहीती वरून पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या आदेशावरुन ग्रामीण पोलिस ठाण्याचे हद्दीत सपोनि चिंचोलकर वाहतूक शाखा व एटीएस पथकाने वाळूमाफियांवर कारवाई केली. मात्र हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यावर कारवाई कधी होणार? याकडे शहर वासियांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेती चोरी करून वाहतूक होत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक यांना मिळताच त्यांनी सपोनि चिंचोलकर यांना कारवाई करण्याचे आदेश दिले.त्यावरून बुधवारी मध्य रात्री 2 वाजता पोस्टे हिंगोली ग्रामीण हद्दीमध्ये ईडोळी गावात पथकाने रेती माफियांवर कारवाई केली यामध्ये दोन ट्रॅक्टर सह रेतीसाठा असा 11 लाख 6 हजार रुपयाच्या मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली. याच प्रकारे हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे हद्दीत कारवाई ची धडक मोहीम राबवून अवैध गुटखा, मटका, अवैध दारू आदी अवैध धंद्यावर कधी कारवाई होणार? याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे. अवैध वाळू वाहतुकी विरूद्ध करण्यात आलेल्या कारवाई मधे सपोनि ओमकांत चिंचोलकर, पोलिस कर्मचारी फुलाजी सावळे, पारसकर, अमित मोडक, वसंत चव्हाण, सुभाष घुगे, गजु राठोड, महेश बंडे, रुपेश धाबे, कैलाश घुगे यांनी महत्त्वपुर्ण कामगिरी बजावली आहे.


COMMENTS