-----------------------------------------------------------
जागतिक करोना महामारीचे संकट असतांना देखील नॅशनल युनियन आॅफ सीफेरर्स आॅफ इंडिया (न्यूसी) ने नॅशनल मेरीटाईम बोर्ड अंतर्गत जहाज मालकांच्या संघटनेशी वेतन करार केल्याने नाविकांचा लाभ तसेच वेतनात भरघोस वाढ झाली.
७ डिसेंबर 2020 रोजी नॅशनल युनियन आॅफ सीफेरर्स आॅफ इंडिया चे सरचिटणीस श्री.अब्दुल गनी सेरंग आणि त्यांच्या सहकार्यांनी नॅशनल मेरीटाईम बोर्डच्या अंतर्गत नाविकांसाठी मुंबई येथे वेतन करार संपन्न केला.या करारात फाॅरेन गोईंग ,होम ट्रेड ,आॅफशोर जहाजा व्यतिरिक्त यावेळी टग/क्राफ्टस या क्षेत्राचा देखील समावेश केला आहे.
ह्या कराराचा कालावधी १ एप्रिल २०१९ ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत राहिल. या वेतन करारानुसार भारतीय ध्वजाच्या फाॅरेन गोईंग जहाजांच्या नाविकांना पगारात ४०% वाढ होईल.होमट्रेड जहाजांच्या नाविकांच्या वेतनात २०% वाढ होईल ,आॅफशोर जहाजांच्या नाविकांना १०% वाढ होईल तसेच टग /क्राफ्ट या क्षेत्रात काम करणार्या नाविकांना १५% वाढ होईल.करोनाच्या महामारीत देखील भरघोस पगारवाढ झाल्याने न्यूसीचे सरचिटणीस श्री.अब्दुलगनी सेरंग व न्यूसीचे सहाय्यक सरचिटणीस श्री.मिलिंद कांदळगांवकर यांच्यावर नाविक कामगारांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. नाविक आणि त्यांचे कुटुंबिय या भरघोस पगारवाढीने अत्यंत खुश आहेत.
मारुती विश्वासराव

COMMENTS