संसदे पासून ग्राम पंचायत पर्यंत सर्व विधीसभेत दिव्यांना सदस्यता मिळवी यासाठी राष्ट्रपतीला मागणी.

कंधार भारतीय लोकशाही जगात विशालकाय आहे.लोकशाहीत सर्व जातीनीहाय आरक्षण मंडल आयोगाने मिळवून दिले.पण समाजात अपंग व्यक्ती आहेत.त्यांना केंद्र शा...

कंधार

भारतीय लोकशाही जगात विशालकाय आहे.लोकशाहीत सर्व जातीनीहाय आरक्षण मंडल आयोगाने मिळवून दिले.पण समाजात अपंग व्यक्ती आहेत.त्यांना केंद्र शासनाने दिव्यांग म्हणुन नामकरण केले खरे पण...नुसते नामांतर करुन दिव्यांग बंधुचा विकास होत नसतो.तर त्यांना प्रवाहात घेण्यासाठी आरक्षण गरजेचे आहे.जर दिव्यांग व्यक्ती देशातील सर्व विधीसभेत सदस्य म्हणुन निवडल्या गेल्यास दिव्यांगाच्या अडीअडचणी मांडता येतील.जन्मजात त्यांच्यावर शारीरिक अवयावर आघात होवून अन्याय होतो.पण लोकशाहीत त्यांच्या मागण्यांबाबत अनेकजण उदासीन असतात.म्हणुन दिव्यांग व्यक्तींच्या अडीअडचणी सोडविण्यास देशातील सर्व विधीसभेत सदस्या दिल्यास खरा सामाजिक विकास साधता येईल. शरीराने अपंग असलेल्या व्यक्ती पेक्षा बुध्दीने अपंग असलेल्या व्यक्ती समाजाला घातक असतात. कलाकार,साहित्यिक,उद्योजक,अनेक गुणी जनांना राज्यसभा,विधान परिषद, स्विकृत सदस्य अशा अनेक माध्यमातून विधीसभेत प्रवेश करतात.पण समाजातील दिव्यांग व्यक्ती फक्त या सदस्या पासून वंचित घटक आहे.त्यांना आरक्षणाची खरी गरज आहे.फक्त महिन्याला 1000 रु.दिव्यांग भत्ता देवून शासन आणि ग्राम पंचायत, नगरपालिका या ठिकाणी वर्षाला 5% निधी सर्व अपंगात विभागुन वाटप करतात. एवढ्याने अपंगाचा विकास होतो असा दावा करणे चुकीचे वाटते.जर सदस्यता मिळाली तर न्याय हक्कासाठी विधीसभेत प्रश्न मांडता येतील.शरिरीचा एक एक अवयव कमी झाल्याने त्यांच्याकडे दिव्यांग असतो हे शासनाने मान्य केले.जर देशातील सर्व विधीसभेत सदस्यता मिळाल्यास त्यांना न्याय मिळेल असे वाटते.नोकरीत 3%आरक्षण कागदावर असतांना किती ठिकाणी त्यांची तंतोतंत अंमलबजावणी होते.हे संशोधनाचा विषय आहे.देशातील सर्व दिव्यांग बांधवांना सर्व विधीसभेत सदस्य म्हणुन निवड म्हणजे समाजिक क्रांतीचे एक पाऊल म्हणत येईल. म्हणुन मला ही मागणी जागतिक दिव्यांग दिनी म्हणजे 3 डिसेंबर 2020 औचित्याने संत श्री गुरु नानकदेवजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने हे निवेदन या नोव्हेंबर महिन्यात तर गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर 30 नोव्हेंबर 2019 रोजी याच तारखेस महिन्यात महामहिम पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीना माझ्या शेतकरी राजाला "कृषीभारतरत्न " पुरस्कार भारत सरकार व्दारा देण्याची मागणी केली.बरोबर त्याच तारखेस फक्त वर्ष 2020 रोजी हे दिव्यांगांना सर्व विधीसभेत सदस्यासाठी आरक्षण देण्याची मागणी याच 30 नोव्हेंबर2020 रोजी देशाचे महामहिम राष्ट्रपती,पंतप्रधान, केंद्रीय मंत्री,महाराष्ट्राचे राज्यपाल,मुख्यमंत्री,सामाजिक न्याय मंत्री,प्रहार जनशक्ती सर्वेसर्वा आमदार व राज्यमंत्री मा.बच्चुभाऊ कडु यांचे सहित मा. जिल्हाधिकारी साहेब नांदेड आणि कंधार मामलेदार साहेब यांना निवेदनाच्या प्रती दिल्या.या निवेदनावर तालुक्यातील दिव्यांग बांधव,अँड प्रा.डाॅ.प्रकाश डोम्पले,बालाजी चुकलवाड, मुख्याध्यापक सदाशिव आंबटवाड,पत्रकार बांधवांच्या स्वाक्षर्या आहेत.पत्र लिहिण्यासाठी अझहर बेग सरांनी मोलाची साथ दिली.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group