करखेली येथे पोलिस प्रशासनाची बैठक संपन्न


धर्माबाद (अहमद लड्डा) ग्रामपंचायत निवडणुकीमुळे धर्माबाद तालुक्याच्या करखेली येथे पोलिस प्रशासनाची बैठक सम्पन्न झाली. या बैठकीत धर्माबाद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री सोहन माछरे यांनी मार्गदर्शन करताना शासनाच्या नियमांचे पालन करण्याच्या विषयी सांगितले. ते म्हणाले की या क्षणी आचारसंहिता असल्यामुळे कोणत्याही उमेदवाराने मतदारसंघात रुपयांचा लोभ दिला तर गुन्हा नोंदवून कठोर कारवाई केली जाईल. या ठिकाणच्या ग्रामपंचायती बिनविरोधात निवडी झाल्यास त्या सर्व उमेदवारांचा पोलीस प्रशासनाकडून गौरव होईल. यासाठी प्रयत्न करण्याची माहिती श्री.माछरे यांनी दिली. या सभेसाठी धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्री गणेशराव पाटील करखेलीकर, सहायक पोलिस निरीक्षक अशोक उजगरे, पंचायत समिती चे उपसभापती चंद्रकांत वाघमारे, करखेली चे उप सरपंच अब्दुल बाबा, जाहेद सेठ, जावेद फूलवाले, रफी मुल्ला, सादिक कुरेशी, अन्वर मेस्त्री , गोपाळ देसाई, अनिल कवडेवार, रवी हेमके, देवीदास लेंडेवाड, पोलिस जमादार जाधव, आणि ग्रामपंचायत सदस्य पोलिस कॉन्स्टेबल नागरगोजे उपस्थित होते.

टिप्पण्या
Popular posts
23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये*
इमेज
मुंबई पोर्ट ट्रस्टमधील सामाजिक कार्यकर्ते सतीश तुपे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार*
इमेज
तब्बल ३८ दिवस चोवीस तास कार्यालयात मुक्काम ठोकणाऱ्या धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांचा भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार
इमेज
नांदेड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना (जुक्टा) कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा जाहीर सत्कार
इमेज
थोरांदळे गावात हनुमान जयंती उत्सवानिमित्त पुरी, गुळवणी व चटणीचा महाप्रसाद*
इमेज