वाढदिवस एका आदर्श व्यक्तीमत्वाचा पत्रकारा़च्या अडी अडचणीत खंबीरपणे साथ देणारे नेतृत्व नंदुभाऊ तोष्णीवाल

जिल्हा प्रतिनिधी महेंद्र पुरी, हिंगोली

हिंगोली जिल्हायाच्या पत्रकारीतेला लाभलेले एक आदर्श व्यक्तीमत्व अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल यांचा आज वाढदिवस त्यांना ग्लोबल मराठवाडा च्या वतीने हार्दिक शुभेच्छा..

नंदकिशोर तोष्णीवाल यांच्या बद्दल लिहावे तेवढे कमीच व्यापारी वर्गात जन्मलेल्या नंदकिशोर तोष्णीवाल यांना सुरूवातीपासुनच सामाजिक कार्याची आवड होती. त्यानंतर अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी स्विकारल्या नंतर नंदुभाऊ तोष्णीवाल यांनी जिल्ह्यातील पत्रकारांच्या अडिअडचणीसाठी जिवाचे रान केले. जिल्ह्यात कुठल्याही पत्रकारावर अन्याय झाल्यास स्वतः पुढे होऊन पत्रकाराला न्याय देण्यासाठी आंदोलने, उपोषने केली. पत्रकारावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध कडक कायदा करण्यासाठी मागणी लाऊन धरत जिल्ह्यात तिव्र आंदोलने केली. पत्रकारांसाठी आरोग्य शिबीर, दंतचिकित्सा शिबीर, रक्तदान शिबीर,पत्रकार व त्यांच्या परिवारा साठी स्वतः पुढाकार घेऊन विविध आरोग्य शिबीराचे आयोजन करीत पत्रकारांच्या आरोग्यासाठी त्यांची धडपड बरच काही सांगुन जाते. विद्यार्थ्यां साठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, मराठी पत्रकार संघाचे वतीने कोरोना काळात सर्व परिक्षा केंद्रावर सेनिटायजर चे वाटप करून कोरोना जनजागृती केली, पुरग्रस्तांसाठी निधी चे संकलन करून अर्थीक मदत केली, व्रतपत्र विक्रेत्यांच्या विविध मांगण्यासाठी आंदोलनात सक्रीय सहभाग, हिंगोली जिल्हातील कळमनुरी तालुक्यात दुष्काळावर मात करण्यासाठी सत्यमेव जयते वाँटरकप अंतर्गत पाणी फाउंडेशन स्पर्धेत जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने रामवाडी गाव दत्तक घेऊन परिश्रम घेतले होते यावेळी या गावाने स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला होता यावेळी नंदकिशोर तोष्णीवाल यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अमीर खान यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता. पत्रकारिता बरोबरच सामाजिक कार्यातही त्यांचा सक्रीय सहभाग असतो. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाच्या वतीने मागील अनेक वर्षापासून दर्पन पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन नंदूभाऊ तोष्णीवाल यांच्यावतीने करण्यात येते ज्यामधे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा दर्पण पुरस्काराने गौरव करण्यात येतो.

त्यांच्या प्रसिद्धीला जळून त्यांच्यावर दोन वेळेस जिवघेणा हल्ला होउन सुध्दा न डगमगता पुन्हा हिमतीने उभे टाकुन आपले सामाजिक कार्य त्यांनी पुढे सुरूच ठेवले अशा महान व्यक्तीमत्वासाठी मला दोन शब्द सुचतात

*लोक म्हणतात मानसाने सोन्यासारखे असावे पण मी म्हणतो माणसाने सोन्या सारखे नसावे कारण सोने हे गळ्यात घालतात, हातात घालतात आणि शेवटी तिजोरीत ठेवतात तर माणसाने परिसासारखे असावे जसे आमचे नंदू भाऊ तोष्णीवाल एक परिस आहेत ज्यांच्या संगीतीत राहतील त्याचे सोने होईल आशा आदर्श व्यक्तीमत्व असणाऱ्या जेष्ठ पत्रकारास उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना*


टिप्पण्या
Popular posts
23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये*
इमेज
मुंबई पोर्ट ट्रस्टमधील सामाजिक कार्यकर्ते सतीश तुपे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार*
इमेज
तब्बल ३८ दिवस चोवीस तास कार्यालयात मुक्काम ठोकणाऱ्या धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांचा भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार
इमेज
नांदेड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना (जुक्टा) कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा जाहीर सत्कार
इमेज
*अन्याया विरूद्ध संघटीत व्हा! सचिन अहिर यांचे कामगार दिनानिमित्त कामगारांना आवाहन*
इमेज