केज प्रतिनिधी.
देशाचे कणखर नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांचा 80 व्या वाढदिवसानिमित्त पक्षाच्या वतीने व्हॅर्च्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. विशेष कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहण्याची सोय शिक्षक पतपेढी पतसंस्था येथे करण्यात आली होती.या कार्यक्रमास केज तालुक्यातील राष्ट्रवादी पदाधिकारी, तसेच युवकांनी कार्यकर्त्यांनी मोठ्या संस्थेने सहभाग नोंदविला होता. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या हस्ते पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला. यावेळी जेष्ठ नेते नवाब मामु, तालकाध्यक्ष नंदकुमार मोराळे, युवक तालुकाध्यक्ष मुकूंद कणसे,शहराध्यक्ष भाऊसाहेब गुंड,विलास जोगदंड,बालासाहेब बोराडे, पंचायत समिती सदस्य,नारायण शिंदे,पिंटु ठोंबरे,बंडू चौधरी, गुंडाप्पा भुसारी, प्रेमचंद कोकाटे, हिंदी भाषिक सेलचे जिल्हाध्यक्ष सय्यद शरीफ,नाना हंडिबाग, विनोद गुंड,आकाश गायकवाड तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.


COMMENTS