नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
नायगांव तालुक्यातील मौजे कुंटुर परिसरातील मौजे सातेगाव येथील सर्वात वयोवृद्ध मतदार म्हणून आपले मतदानाचा हक्क बजावले आहेत. येथील तेजेराव गंगाराम लंगोटे राहणार सातेगाव वय वर्षे 75 यांनी आज पदवीधर मतदार म्हणून आपले मतदान केले आहे .लंगोटे यांची पधवीधर ही 1974 मध्ये डिग्री धारक आहेत तेव्हापासून त्यांनी आजपर्यंत सर्व मतदान प्रक्रिया न चुकता व आपला हक्क समजून दर सहा वर्षाला ते मतदान करत असतात योग्य उमेदवार ला हे मतदान देऊन आपले मतदानाचा हक्क बजावतात .त्यामुळे सर्वात वयोवृद्ध मतदार म्हणून ही त्यांची या परिसरामध्ये चर्चा सुरू असून सर्वात जुने व सर्वात वयोवृद्ध मतदार म्हणून त्यांची आज रोजी मतदान करताना घेतलेली छायाचित्रे आहेत.ही सर्वांना व सुशिक्षित बेरोजगार व मतदानापासून अलिप्त राहिलेल्या मतदारांना एक प्रकारची शिकवण देऊन जात आहे. आज मतदार उच्चशिक्षित असून नोंदणी करण्यापासून वंचित आहेत काही नोंदणी करून सुद्धा मतदान करण्यापासून अलिप्त राहतात त्यांच्या मानसिकतेला एकप्रकारची चालना देण्याचे काम या वृद्ध मतदार यांनी एक प्रकारचे आव्हान केल्याचेही दिसत आहे .त्यामुळे कूंटूर बुथवर सातेगाव येथील तेजराव गंगाराम लंगोटे वय वर्ष 75 यांनी मतदान करून आपला हक्क बजावून एक प्रकारे लोकशाहीचा आधार बनले आहेत त्यावेळी सर्व स्तरातून त्यांची कौतुक होत आहे. यावेळी उपस्थित शेषराव पाटील बेलकर तालुका अध्यक्ष संगणक संघटना नायगांव, गणेश चोंडे सर सचिव संघणक संघटना नायगांव टाकळी,प्रल्हाद कदम, प्रकाश महिपाळे मेळगाव, बापुराव डाकोरे,संगीता रहाटे मॅडम हंगरगा,मालु कांबळे कुंटुर,मौला शेख ,

COMMENTS