*
प्रतिनिधी - दिवाळी हा सण इतर सणापेक्षा मोठा मानला जातो, या उस्तवात गरीबातील गरीब सुद्धा काहीतरी करून आपल्या मुलाबाळांना गोडदोड करून देण्याचा प्रयत्न करीत असतात.पण यावेळी कोरोना सारख्या महाभयंकर रोगाने जगावर आलेल्या संकटामुळे गेली सात-आठ महिने लोकांना रोजगार नाही.त्यामध्ये रस्त्यावर (फुटपाथ) वरील राहणाऱ्या कुटूंबाची अवस्था त्याहून अधिक वाईट अशावेळी त्यांच्या मदतीला प.पू.श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिविंगच्या माध्यमातुन मुंबईतील बेघर असणाऱ्या पाचशे कुटूंबांना आजच्या पहिल्या अभ्यंगस्नान दिवशी श्री लक्ष्मीपूजनला त्यांना दिवाळी फराळ खाता यावा म्हणून शिवडी, वडाळा, किंगसर्कल, सायन,तसेच माहीम येथील गरिबांसाठी सुरू केलेल्या ओपन फ्रीज मध्ये सुद्धा दिवाळीचा फराळ ठेऊन गरिबांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासाठी आर्ट ऑफ लिविंगच्या योगा प्रशिक्षक रेश्मा परब, मनसेचे संदीप कदम, लावणी कलावंतचे संतोष लिंबोरे,धगधगती मुंबईचे संपादक भिमराव धुळप,सचिन धुमाळ आणि प्रकाश शिंदे यांच्या माध्यमातूनही दिवाळी फराळ वाटण्याचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडता आला. हा फराळ वाटताना खरोखरच त्या गरिबांच्याया चेहऱ्यावरील आनंद बरेच काही सांगून जात होता.
COMMENTS