*नायगाव प्रतिनिधी*
( रामप्रसाद चन्नावार ) *नायगाव तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय कुंटूर येथे सन २०१५ मध्ये सरपंच पदावर विराजमान झालेले रुपेश देशमुख कुंटूरकर उपसरपंच शिवाजी पाटील होळकर व सर्वच ग्रामपंचायत सदस्य यांचा कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण झाल्याने ग्रामपंचायत कार्यालय कुंटूर येथे सरपंच व सर्व सदस्य यांचा सत्कार सभारंभ कार्यक्रमाचे आयोजन सत्कार करून निरोप देण्यात आला.*
*दरम्यान राजेशजी देशमुख कुंटूरकर यांच्या मध्येमातून व सरपंच रुपेश देशमुख यांच्याच काळात कुंटूर येथील प्राथमीक आरोग्य केंद्राच्या हायटेक इमारत व निवास बिल्डिंगचे काम प्रगतीपथावर आहे गावात आठवडी बाजार सुरु करण्यात आला असून या बाजाराला जनतेनी चांगलाचं प्रतिसाद दिला आहे, ग्रामपंचायत कार्यालयाचे सरपंच रुपेश देशमुख कुंटूरकर व उपसरपंच शिवाजी पा. होळकर यांच्या मध्येमातून ग्रामविकास अधिकारी राजकुमार दमकोंडवार यांच्या प्रयत्नामुळे जुन्या गावातील अंदाजे ४० वर्षाखालील जुनी पाईपलाईन बदलून टाकून नवीन पाईपलाईन बसवण्यात आली आहे. रमाई व प्रधानमंत्री आवास योजनेचे ४२* *घरकुल वाटप केले आहे. गावातील ५२ दिव्यांग बांधवाना प्रत्येकी ७ हजार प्रमाणे वाटप करण्यात आले तर जिल्हा परिषद हायस्कुल कुंटूर येथील विध्यार्थ्यांचे आरोग्य बाधित राहण्यासाठी पिण्यास योग्य पाणी मिळावे म्हणून वाटर फिल्टर बसविण्यात आले आहे.*
*कुंटूर शहरात राजेश देशमुख कुंटुरकर यांच्या प्रयत्नामुळे व लक्ष्मण पाटील अडकिने , शिवाजी पा. होळकर , सूर्यकांत पाटील कदम त्यांच्या मार्गदशनाखाली १००० मीटरचे सीसी. रस्ते बनविण्यात आले आहेत, तर चार ठिकाणी हायमास ( मोठी एलईडी ) बसविले तर दलित वस्तीतील अण्णा भाऊ साठे समाज मंदिरास संरक्षण भिंत बांधून देण्यात आली, तसेच मुस्लिम बांधवांचे कब्रस्थान व* *शादीखान्यास संरक्षण भिंत बांधण्यात अली तर कुंटूर तांडा येथे सीसी रस्ते सह अंगणवाडीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. पत्रकार शंकर आडकिने यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे त्याच्या गल्लीतील नालीचे काम सुरु करण्यात आले आहे.*
*कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर आरोग्य कर्मचारी ,ग्रा. प. कर्मचारी , अंगणवाडी सेविका ,आशा वर्कर यांना प्रोत्सहांन भत्ता देऊन सन्मानित करण्यात आले. वाडी - वस्त्यावर सीसी रस्त्याचे भरीव कामांसह गावात अनेक विविध विकास कामे केले आहे आज त्यांचा पाच वर्षाचा कालावधी खेळीमेळीत यशस्वीपने पूर्ण केले असल्याने त्यांचा शाल, श्रीफळ, दस्ती , टोपी पुष्पहार घालून ग्रामविकास अधिकारी राजेश दमकोंडवार , पंडित पा. आडकिने , शिवाजी पा. होळकर ,यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच रुपेश देशमुख ,उपसरपंच शिवाजी होळकर,पंडित पा. आडकिने , लक्ष्मण पा. आडकिने ,रज्जाक गुजीवाले ,अनिल पवार ,वाघमारे , डीडी होळकर ,गुंठे ,बंटी भोजराज , हसंपल्ले ,नागनाथ गिरी,उद्धव हणमंते ,शिवानंद रेनेवाड ,परसराम जाधव , माधव काळेवार ,पत्रकार शंकर अडकिने माधव धडेकर आदींसह प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती होती,*
COMMENTS