महेंद्र पुरी, जिल्हा प्रतिनिधी हिंगोली
सध्या महाराष्ट्रात दिवाळी चा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. मात्र शेतकरी पिके हातची गेल्याने अर्थिक संकटात सापडला आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी दिवाळी सण साजरा केलाच नाही.अशाच प्रकारे हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील ताकतोड येथील शेतकऱ्याच्या मुलीने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून सोशल मीडियावर व्हायरल केल्याने या पत्राची दखल घेत हिंगोली येथे कार्यरत सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांनी सदर मुलीच्या घरी पोलिसांना पाठून मिठाई पाकिट, कपडे, फटाके करीता तात्काळ मदत केली.
ताकतोडा येथील समीक्षा सावके या बारा वर्षीय मुलीने लिहिलेल्या पत्रात मुख्यमंत्री साहेब माझ्या बाबांनी कपडे व फटाके घेतले नाहीत यावर्षी आमच्या गावपरिसरात जास्त पाऊस झाल्याने पिके हातची गेली सोयाबीन गेल्याने पैसे नाहीत , कर्ज हि माफ झाले नाही, दिवसा लाईट राहत नसल्याने बाबांना रात्री शेतात जावे लागते, बाबा अडचणीत असल्याने आम्हाला कपडे व फटाके घेतले नाही त्यामुळे आमच्या घरी दिवाळी नाही असे पत्र कागदावर लिहून सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने. या पत्राची तात्काळ दखल घेऊन हिंगोलीचे आयपिएस यतीश देशमुख यांनी स्वतः सदर मुलीला मदत करीत पोलिसांना तिच्या घरी पाठवून तात्काळ मिठाई, कपडे, व फटाक्यासाठी अर्थीक मदत केली. यामुळे समीक्षा च्या चेहरा आनंदाने फुलून गेला होता. आयपिएस यतीश देशमुख यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
COMMENTS