शेतमजूर भूमिहीन मजुरांसाठी पाच हजार रुपये आर्थिक मदत करण्यात यावी
आष्टी (दादासाहेब बन)
गेल्या 2014 ते 2019 या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार असताना या सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक वेळा पिक नुसकान, बोंड आळी, पिक विमा अशा माध्यमातून सरसकट शेतकऱ्यांना तीन वर्षी मदत केलेली होती .याहीवर्षी अतिवृष्टी अतिवृष्टी मुळे त्याचबरोबर कोरोणाच्या कालखंडामध्ये शेतमजूर ,भूमिहीन कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न बंद झाल्याने त्यांचे संसार उघड्यावर आलेले आहेत. यासाठी सध्याच्या शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेस या मिश्र सरकारने आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना पिक नुसकान नीचे सरसकट आर्थिक अनुदान द्यावे अशी मागणी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली. यावेळी बोलताना माजी आमदार धोंडे म्हणाले की यावर्षी शेतकऱ्यांसाठी दुबार पेरणी, अतिवृष्टी ,बोगस बियाणे व कोरोना महामारी च्या काळात उत्पादित शेतीमालाला योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .त्याचबरोबर कोरोनाच्याच्या आठ महिन्याच्या कालावधीत सर्व उद्योग धंदे व्यवसाय बंद असल्याकारणाने भूमिहीन शेतमजूर इतर मजुरी करणारे कामगार यांना रोजगार उपलब्ध झाला नाही. अशा कालावधीत जीवन जगण्यासाठी आर्थिक समस्यांचा सामना या लोकांना करावा लागत आहे .आज महत्त्वाचा सण दीपावली साजरी करण्यासाठी ही या लोकांकडे पैसा उपलब्ध नाही या सर्व अडचणीमुळे हा वर्ग जेमतेम जीवन जगत आहे याकरिता मागील भाजप सरकारच्या काळामध्ये अनेक वेळा शेतकऱ्यांच्या संकटामध्ये सरकारने शेतकऱ्यांना मदत केली आहे केली होती .त्याच प्रमाणे याही सरकारने अशा गोरगरीब शेतमजूर, भूमिहीन व व्यवसाय बंद झाल्याने अडचणीत आलेले रोजगार तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची झालेली शेतीमालाची हानी यासाठी सरसकट आर्थिक अनुदान व शेतमजुरांना प्रत्येक कुटुंब 5000 रुपये दीपावली मदत करावी अशी मागणी आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
COMMENTS