वडवणी /जगदीश गोरे
तरुणांनी व्यवसायात जिद्द व चिकाटी ठेवल्यास यश मिळतेच व सध्या तरुणाने नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाकडे वळावे असे प्रतिपादन सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी वडवणी येथे सावता मशिनरीच्या उद्घाटनप्रसंगी केले.
या कार्यक्रमास जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाबरी मुंडे, सावता परिषदेचे प्रदेश प्रवक्ते डॉ राजीव काळे, भारत यादव, संतोष डावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे वडवणी तालुकाध्यक्ष बजरंग साबळे, शिवसेनेचे धारूर तालुकाप्रमुख बाळासाहेब कुरुंद,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र डोईजड, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कुंदन काळे, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे अजय कोकाटे, व्याख्याते सुसेनजी नाईकवाडे,पत्रकार जगदीश गोरे, वचिष्ठ यादव, सावता परिषदेचे जिल्हाउपाध्यक्ष शामराव शिंदे,सावता परिषदेचे जिल्हा प्रवक्ते सूर्यनारायण यादव, वडवणी तालुकाध्यक्ष दत्ता ढवळे, सुमंत यादव, दत्ता यादव यांच्यासह यादव व ढगे परिवारातील सदस्य यांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना कल्याण आखाडे म्हणाले की, व्यवसायात मेहनत जिद्द चिकाटी ठेवल्यास पुढील काळात निश्चित तुम्हाला व्यवसाय हा प्रगती पथावर नेऊन ठेवतो सध्या युवकांना राजकारणात जास्त रस वाटतो परंतु राजकारण करत असताना व्यवसायालाही महत्त्व दिले पाहिजे यावेळी अमोल यादव व विलास ढगे यांनी मान्यवरांचे हार, शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व मान्यवरांनी सावता मशिनरी या दुकानाला शुभेच्छा दिल्या.
COMMENTS