*
सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटक कुटूंबातील एक महिला गेली.
प्रतीनिधी- शेख आरीफ
नांदेड :-दि.10. यवतमाळ जिल्ह्यातून सहस्त्रकुंड धबधबा पर्यटन स्थळ पाहण्यासाठी आलेल्या पर्यटक कुटूंब पाण्याच्या प्रवाहात अडकल्याने संतोष कुमार व त्याच्या दोन मुली पाण्याच्या प्रवाहातून बाहेर निघाल्या तर ममता कुमार ही चाळीश वर्षाची महिला(आई) पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना नांदेड जिल्ह्यातील सहस्त्रकुंड धबधबा येथे दिनांक 10 आक्टोबर 2020 रोजी सायंकाळी साडे चार वाजल्याच्या सुमारास घडली आहे.
झारखंड राज्यातील संतोष कुमार हे यवतमाळ येथील पंजाब नॅशनल बॅंकेमध्ये कलर्क या पदावर कार्यरत होते,ते आज नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील सहस्त्रकुंड धबधबा पर्यटन स्थळ पाहण्यासाठी आले असता धबधब्याच्या वरील बाजूस सेल्फी काढण्यासाठी नदीमध्ये गेले होते.अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने संतोष कुमार (पती) ममता कुमार (पत्नी) व दोन मुलीसह हे नदीमध्ये अडकले असता त्या पाण्याच्या प्रवाहातून या पर्यटक कुटुंबाला बाहेर काढण्यासाठी मौजे मुरली येथिल संतोष राठोड वय 26 वर्ष या तरूणाने शर्यतीचे पर्यत्न करत बाहेर काढत असताना ममता कुमार (पत्नी) वय 40 वर्ष ही माहिला त्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना विदर्भातील उमरखेड मुरली साईट कडून घडली आहे.
COMMENTS