माजलगाव/प्रतिनिधी
विद्या भारती अखिल भारतीय शिक्षा संस्थान आयोजित राष्ट्रीय नवीन शैक्षणिक धोरण २०२० वर आधारित अखिल भारतीय स्तरावर my nep या स्पर्धेत राष्ट्रीय नवीन शैक्षणिक धोरण २०२० अनुसरून निबंध स्पर्धेत (९ वी ते १२गटातून)येथील श्री सिध्देश्वर माध्यमिक विद्यालयातील चि वैभव आदिनाथ कुंडकर (सर्वप्रथम राष्ट्रीय स्तर) याने यश संपादन केले आहे.
या यशस्वी स्पर्धकांचे भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेंद्र आलूरकर, उपाध्यक्ष राधेश्याम लोहिया, कार्यवाह नितीन शेटे, सहकार्यवाह प्रा चंद्रकांत मुळे, डॉ हेमंत वैद्य, श्रीमती कल्पनाताई चौसाळकर तसेच श्री सिध्देश्वर शैक्षणिक संकुलाचे पालक सुनील लोढा, अध्यक्ष प्रकाश दुगड, कार्यवाह अमरनाथ खूर्पे, माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष प्रेमकिशोर मानधने तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबुराव आडे गुरुजी, उपमुख्याध्यापक निवृत्ती दराडे सर, पर्यवेक्षक उमेश थाटकर, मिलिंद वेडे, दिलीप चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे.
COMMENTS