बीडमध्ये रासपाचे धरणे आंदोलन
मादळमोही दि,२० (संतोष भारती):- अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. महाविकास आघाडी सरकारने ओला दुष्काळ जाहीर करुन, शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपायाची मदत करावी अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष परमेश्वर वाघमोडे यांनी केली. परमेश्वर वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी रासपाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने राष्ट्रनायक महादेव जानकर यांच्या आदेशाने शेतकरी बांधवांसाठी ओला दुष्काळ जाहीर करावा, त्याच प्रमाणे पंचनामे न करता शेतकऱ्याच्या सरसकट एकरी पन्नास हजार रुपयाची मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी या मागणीसाठी मंगळवार दि.20 रोजी बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालया समोर एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना वार्यावर सोडू नये, अतिवृष्टीची झळ सर्व शेतकर्यांना बसली असून, सरकारने तातडीने मदत करावी नसता तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष परमेश्वर वाघमोडे यांनी दिला. यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर महाराज वाघमोडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष नंदाताई सारुख ,रेखाताई शिंदे, सुरेश नवले, सचिन खरात ,बालाजी खरात, भगवान घाडगे, प्रवीण घुगे कृष्णा धापसे, शिवाजी सिंगाडे ,सरपंच मच्छिंद्र शिंगाडे, शेंडगे सरपंच अशोक आपटे, युवा मल्हार सेनेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक मतकर , शिवाजी काळे , धनंजय बुसनर, रवी माने इत्यादी उपस्थित होते.
COMMENTS