शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांसाठी लढवून शेतकर्‍यांना मदत मिळवून देऊ -संभाजी राजे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पाहणी


 


मादळमोही , दि.२० ( संतोष भारती) :- परतीच्या पावसाने बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतातील पिके उद्ध्वस्त केली आहेत. अशा भयावह परिस्थितीत शेतकर्‍यांना मदत मिळवून देण्यासाठी आपण स्वत:हून राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत शेतकर्‍यांना मदत मिळवून देऊ. पंतप्रधान असोत की मुख्यमंत्री शेतकर्‍यांसाठी या दोघांसोबत चर्चा करून जास्तीत जास्त मदत कशी मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राज्यसभा खा. छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी सांगितले. 


  ते बीड जिल्ह्यात शेतकर्‍यांच्या शेतातील नुकसानीची पाहणी दि.२० आँक्टोबर २०२० रोजी गेवराई तालुक्यातील कोळगांव, तांदळा येथील शिवारात करण्यासाठी आले आहेत. आज सकाळी छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी गेवराई तालुक्यातील कुंभारवाडी, सावरगाव, कोळगाव, तांदळा आदी गावातील शेतकर्‍यांच्या शेतात जावून पाहणी चर्चासत्र केली. त्यानंतर दुपारच्या सुमारास शेतकऱ्यांच्या घरी बेसन बाजरीची भाकरी, कांदा असे जेवण केले. या वेळी त्यांच्या सोबत शेतकरी संघटनेच्या पुजा मोरे, गंगाधर काळकुटे, शेतकरी संघटनेचे नेते बंगाळे पाटील, यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. 


  पुढे बोलताना छत्रपती संभाजी राजे भोसले म्हणाले की, गेल्या दोन दिवसांपासून आपण विविध ठिकाणी जावून शेतकर्‍यांच्या शेतातील पिकांची पाहणी करत आहोत. परतीच्या पावसाने हाता तोंडाशी आलेलं पिक अक्षरश: पाण्यात गेलं, कापसाच्या वाती झाल्या, ऊस कोसळला, सोयाबीनला कोंब फुटले, अंतरपिक वाहून गेले, त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आपण कायम शेतकर्‍यांच्या पाठिशी कायम असून शेतकर्‍यांना मदत मिळवून देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी म्हटले. शेतकर्‍यांच्या पाठिशी राहून त्यांचे प्रश्‍न शासन-प्रशासन दरबारी सातत्याने लावून धरणार असल्याचे संभाजीराजेंनी या वेळी सांगितले. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नासाठी पंतप्रधान असोत की मुख्यमंत्री त्यांच्या सोबत भांडण्याची वेळ आली तरी आपण भांडू, परंतु शेतकर्‍यांना मदत मिळवून देऊ, असे म्हणत संभाजी राजेंनी गेवराई तालुक्यातील कोळगांव,तांदळा येथे कापूस उत्पादक शेतकरी तुकाराम घाडगे, हरिभाऊ हाकाळे यांच्या बांधावर जावून त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या. अतिवृष्टी पाऊसाने उद्ध्वस्त झालेल्या पिकांची पाहणी केली. यावेळी शेतकरी उपसरपंच धनंजय बारहाते, बापू बारहाते, बाबूराव तळेकर, पत्रकार संतोष भारती, बाळासाहेब घाडगे, संतराम जोगदंड, रमेश करांडे, प्रदिप डोंगरे, प्रविण करांडे, हनुमान हाकाळे, आबासाहेब करांडे, श्रीराम घाडगे, अविनाश गवळी, शंकर करांडे, दिपक लोंढे, ऊमेश शिंदे धनंजय बजगुडे, आशोक तळेकर, आदी शेतकरी उपस्थित होते.



 


निमगांव(मायंबा) जलसिंचन प्रकल्प पुर्ण करण्याची मागणी


 


 बीड जिल्ह्यात सिंचन क्षेत्र मागास असुन सतत दुष्काळग्रस्त भाग आहे. शेती व्यवसाय कोरडवाहू आहे. तरी बीड जिल्ह्यातील, शिरूर कासार, गेवराई, बीड तालुके, दुष्काळी तालुके असून शेती व्यवसाय कोरडवाहू आहे. याकडे आजपर्यंत लोकप्रतिनिधी आणि नेतेमंडळी उदासीन आहेत.तरी दुष्काळ परिस्थिती कायमस्वरूपी निवारण करण्यासाठी भंडारा - पैठणच्या तलावासारखे बीड जिल्ह्यातील निमगांव(मायंबा) राळसांगवी, नांदेवली ता. शिरूर कासार.जि.बीड) येथील परिसरातील रखडलेला सिंचन प्रकल्प दुष्काळी परिस्थिती दुर करण्यासाठी आणि कायमस्वरूपी बीड जिल्हा सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी हा प्रकल्प करण्यासाठी प्रयत्न आणि आपल्या वतीने पाठपुरावा व्हावे. तसेच या गोदावरी नदीचे पाणी सिंदफणा पात्रात नदी जोडून जोडले जावे. अशी मागणी निवेदन शासन पातळीवर जाण्यासाठी प्रयत्न करावे. असे निवेदन शेतकरी कार्यकर्ते बाळासाहेब घाडगे(पत्रकार) कृष्णा लोंढे कोळगांवकर, संतराम जोगदंड, बालासाहेब लोंढे, प्रविण करांडे, हनुमान हाकाळे, देण्यात आले.


 


 


बांधावर जाऊन पाहणी केली...


गेवराई तालुक्यातील कोळगांव,येथे कापूस उत्पादक शेतकरी तुकाराम घाडगे, तांदळा येथे तर पाण्यात गेलेल्या तर सावरगांव येथे मक्याच्या शेतामध्ये बांधावर जावून त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या. उत्पादन कमी आणि खर्च जास्त यामुळे राजे शेती व्यवसाय तोट्यात होत आहे. 


नवनाथ गवते, संदिप आंधळे,ऊमेश शिंदे, बाळासाहेब लोंढे, राहूल हाकाळे, राहुल चाळक आदी शेतकरी, महिला यांची उपस्थित होती.


टिप्पण्या