राम दातीर
माहूर ( प्रतिनिधी ) परतीच्या पावसाने माहूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी झाल्याने माहूर तालुक्यात हाहाकार माजला आहे.दि.15 सप्टें.ते 22 सप्टें.या काळात झालेल्या अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन व कापूस या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.त्यामु़ळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना शासना कडून मदत मिळवून देण्यासाठी झालेल्या नुकसानीची तात्काळ पाहणी करून पंचनामे करण्याची लिखित सूचना आ.भीमराव केराम यांनी तहसीलदार माहूर यांना दि.29 सप्टें.रोजी दिलेल्या पत्रातून केली आहे.
निसर्गाच्या दुष्चक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनला मोड़ फुटले असून कापसावर मावा,तुडतुडे,पाती गळणे,बुरशी,बोंड सड़ने व काळे पडण्यासारख्या रोगांचा प्रकोप झाल्याचा उल्लेख आ.केराम यांनी आपल्या पत्रात केला आहे. शेतकऱ्यावर कोसळलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची तातडीने पाहणी करून पंचनामे करण्याची सूचना दिल्याने प्रशासनाची जबाबदारी वाढली आहे.
या संदर्भात तहसीलदार सिद्धेश्वर वरणगांवकर यांचेशी संपर्क साधला असता पंचनामे करण्या संदर्भात मंडळाधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले.
COMMENTS